विठेवाडी ग्रामपंचायतीवर ‘दत्तकृपा’, दत्त कृपा पॅनलला ११ पैकी ९ जागा मिळाल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 02:18 PM2022-12-20T14:18:02+5:302022-12-20T14:19:30+5:30

Gram Panchayat Election Result : अत्यंत चुरशीच्या झालेल्या विठेवाडी येथील ग्रामपंचायत निवडणूक निकालावर दत्तकृपा झाली असून दत्त कृपा पॅनलला ११ पैकी ९ जागा मिळाल्या असून विरोधी गुरुदत्त पॅनलला फक्त दोन जागेवर समाधान मानावे लागले आहे.

'Dattakripa', Dattakripa panel won 9 out of 11 seats on Vithewadi Gram Panchayat | विठेवाडी ग्रामपंचायतीवर ‘दत्तकृपा’, दत्त कृपा पॅनलला ११ पैकी ९ जागा मिळाल्या

विठेवाडी ग्रामपंचायतीवर ‘दत्तकृपा’, दत्त कृपा पॅनलला ११ पैकी ९ जागा मिळाल्या

Next

पंडित पाठक -

 नाशिक -अत्यंत चुरशीच्या झालेल्या विठेवाडी येथील ग्रामपंचायत निवडणूक निकालावर दत्तकृपा झाली असून दत्त कृपा पॅनलला ११ पैकी ९ जागा मिळाल्या असून विरोधी गुरुदत्त पॅनलला फक्त दोन जागेवर समाधान मानावे लागले आहे. तर थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत दत्त कृपा पॅनलचे नानाजी केदा पवार यांनी( १०९६) मते मिळवीत गुरुदत्त पॅनलचे शरद सुकलाल पवार(१0८९) यांचा पराभव करीत विजयश्री प्राप्त केली आहे. निवडणूकीत गुरुदत्त पॅनल व दत्तकृपा पॅनलच्या उमेदवारांमध्ये समोरासमोर लढत झाली या लढतीत सरपंच पदाच्या निवडणुकीत दत्तकृपा पॅनलचे नानाजी केदा पवार हे विजय प्राप्त केला असून सदस्य पदाच्या निवडणूकीत दत्त कृपा पॅनलला ११ जागा पैकी ९ जागांवर विजश्री प्राप्त झाली आहे. तर गुरुदत्त पॅनलला केवळ दोन जागेवर समाधान मानावे लागले आहे.

वार्ड निहाय विजयी उमेदवार व मिळालेली मते पुढील प्रमाणे वार्ड नंबर १) - भाऊसाहेब केदा पवार (२३८), सुनंदा विठोबा (२७९), वार्ड नंबर २)- केवळ पंडीत पवार (३३०), भारती विलास पवार ( ३४०), इंदूबाई भास्कर निकम ( ३८४ ), वार्ड नंबर ३) - बापू काळू जाधव (३५६), राहुल बापू निकम (३४४), हे दोन्हीही उमेदवार गुरुदत्त पॅनलचे विजयी झाले आहेत.पल्लवी सुनील बोरसे यांनी (३०१) मते मिळवून दत्त कृपा पॅनल मधून विजय प्राप्त केला आहे. वार्ड नंबर ४) - ईश्वर दादाजी निकम ( २८७), सायजाबाई सुरेश गांगुर्डे (३०७), सीताबाई केवळ पवार यांना (२८५ ) मते मिळाली आहेत. विठेवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. विठेवाडी ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. दत्तकृपा पॅनलचे नेतृत्व माजी सरपंच भास्कर दादा निकम , विलास निकम यांनी केले. निकाल ऐकण्यासाठी तहसीलदार कार्यालयाबाहेर मत मोजणीस्थळी कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी सकाळ पासूनच मोठी गर्दी केली होती. या निवडणुकीत माजी सरपंच भारती विलास पवार ह्या पुन्हा सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत. सरपंच पद व सदस्य हया दोन्हीही जागेवर निवडणूक लढविणाऱ्या शरद सुकलाल पवार यांना दोन्हीही जागेवर पराभव पत्करावा लागला आहे. तर वार्ड नंबर तीन मध्ये अत्यंत चुरशीच्या लढतीत गुरुदत्त पॅनलचे राहुल बापू निकम व बापू काळू जाधव यांनी विजय प्राप्त केला आहे. विजयी उमेदवारांनी गुलाल उधळून व फटाके वाजवत आपला आनंद व्यक्त केला.

Web Title: 'Dattakripa', Dattakripa panel won 9 out of 11 seats on Vithewadi Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.