सीएचएमएसच्या अध्यक्षपदी दत्तात्रय शेकटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 01:55 AM2018-06-11T01:55:50+5:302018-06-11T01:55:50+5:30

नाशिक : सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी लेफ्टनंट जनरल डॉ. दत्तात्रय शेकटकर यांची निवड झाली असून, सरकार्यवाहपदी डॉ. दिलीप बेलगावकर यांची निवड झाली आहे.

Dattatray Shekatkar, president of CHMS | सीएचएमएसच्या अध्यक्षपदी दत्तात्रय शेकटकर

सीएचएमएसच्या अध्यक्षपदी दत्तात्रय शेकटकर

Next
ठळक मुद्दे सरकार्यवाहपदी बेलगावकर

नाशिक : सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी लेफ्टनंट जनरल डॉ. दत्तात्रय शेकटकर यांची निवड झाली असून, सरकार्यवाहपदी डॉ. दिलीप बेलगावकर यांची निवड झाली आहे.
संस्थेची सर्वसाधारण सभा रविवारी भोसला विद्यालयात झाली. या सभेत संस्थेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून कार्याध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, उपाध्यक्ष अविनाश भिडे, उपाध्यक्ष शैलेश जोगळेकर, सहकार्यवाह सुहास जपे, कोषाध्यक्ष मनोहर नेवे यांचीही यावेळी निवड करण्यात आली आहे. तर नाशिक विभागाचे अध्यक्ष कॅप्टन डॉ. एस. जी. नरवणे, कार्यवाह हेमंत देशपांडे तर नागपूर विभागाचे अध्यक्ष सूर्यरतनजी डागा, कार्यवाह कुमार काळे हे असणार आहेत. सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीची सर्वसाधारण पार पडली. यावेळी संस्थेच्या सभासदांनी बिनविरोध निवडलेल्या नाशिक विभागीय समितीची आणि नागपूर विभागीय समितीची घोषणा केली. संस्थेच्या ११जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत ११ जागांसाठी ११ उमेदवारांनीच अर्ज भरल्याने निवडणूक बिनविरोध पार पडली. संस्थेचे सहकार्यवाह प्रमोद कुलकर्णी यांनी सभासदांसमोर संस्थेचा अहवाल मांडला, त्यास एकमताने मंजुरी देण्यात आली. यावेळी संस्थेचे निवडणूक निर्णय अधिकारी अ‍ॅड. के. जी. कुलकर्णी यांनी कार्यकारिणीची घोषणा केली.

Web Title: Dattatray Shekatkar, president of CHMS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.