शिक्षण सहाय्यक मंडळाच्यावतीने लासलगावी दत्तु भोकनळचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 04:41 PM2020-09-12T16:41:14+5:302020-09-12T16:44:15+5:30
लासलगाव : अर्जुन पुरस्कार प्राप्त दत्तु भोकनळ यांचा लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. अतिशय गरीब कुटुंबातून सैन्यदलात दाखल होऊन आॅलिंम्पिक, अशियाई स्पर्धा गाजवणाऱ्या दत्तु भोकनळ याचा शाब्बासकीची थाप म्हणून संचलित लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालय, जिजामाता कन्या विद्यालय व जिजामाता प्राथमिक त्यांच्या संयुक्त विद्यमाने छोटेखानी सत्काराचे आयोजन करण्यात आले.
लासलगाव : अर्जुन पुरस्कार प्राप्त दत्तु भोकनळ यांचा लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
अतिशय गरीब कुटुंबातून सैन्यदलात दाखल होऊन आॅलिंम्पिक, अशियाई स्पर्धा गाजवणाऱ्या दत्तु भोकनळ याचा शाब्बासकीची थाप म्हणून संचलित लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालय, जिजामाता कन्या विद्यालय व जिजामाता प्राथमिक त्यांच्या संयुक्त विद्यमाने छोटेखानी सत्काराचे आयोजन करण्यात आले.
चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथे वास्तव्यास असणारा दत्तू भोकनळ हा रिओ आॅलिम्पिक मध्ये उपांत्य फेरी गाठणारा भारताचा पहिलाच रोइंगपटू ठरला आहे. केंद्र शासनाचा अतिशय मानाचा अर्जुन पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, सचिव संजय पाटील, निवृत्ती गायकर, निता पाटील, शंतनू पाटील, वैष्णवी पाटील, प्रा. विश्वास पाटील, मुख्याध्यापक संजीवनी पाटील, अनिस काझी, दत्तू गांगुर्डे, सुधाकर सोनवणे आदी उपस्थित होते.