दत्तयात्रोत्सवाची तयारी पुर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 08:00 PM2019-03-24T20:00:39+5:302019-03-24T20:02:11+5:30
कसबे सुकेणे : महाराष्ट्राचे प्रती गाणगापुर म्हणुन प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र मौजे सुकेणे येथील एकमुखी दत्त यात्रोत्सवाची तयारी पुर्ण झाली असुन सप्तरंगात न्हाऊन निघणाऱ्या पालखी सोहळ्यासाठी श्रीक्षत्र मौजे सुकेणे नगरी सज्ज झाली आहे.
कसबे सुकेणे : महाराष्ट्राचे प्रती गाणगापुर म्हणुन प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र मौजे सुकेणे येथील एकमुखी दत्त यात्रोत्सवाची तयारी पुर्ण झाली असुन सप्तरंगात न्हाऊन निघणाऱ्या पालखी सोहळ्यासाठी श्रीक्षत्र मौजे सुकेणे नगरी सज्ज झाली आहे.
मौजे सुकेणे येथील दत्त यात्रोउत्सव रंगपंचमी सोमवारी (दि.२५) पासून सुरु होत आहे. जिल्हा पोलीस प्रशासन, दत्त मंदिर संस्थान आणि ग्रामपालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. सुमारे साडे सातशे वर्षांची परंपरा लाभलेल्या पेशवेकालीन ह्या यात्रेतील सप्तरंगात न्हाऊन निघणारा दत्त पालखी सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक हजेरी लावतात.
पाच दिवस चालणाऱ्या सदर यात्रेत संपूर्ण महानुभाव पंथीय भाविक सहभागी होतात. याठिकाणी विडा अवसर, नारळ हि पूजा देवाला भाविक आवर्जून वाहतात व नवसपूर्ती करतात. यात्रेत रेवडी, साखरेचे हार, कडे, गुडीशेव, जिलबी याची मोठ्या प्रमाणात विक्र ी होते.
जिल्ह्यातील मोठा यात्रौत्सव म्हणून ओळख असलेल्या या यात्रेची तयारी सर्व पातळीवर पूर्ण झाली आहे. रविवारी (दि.२४) राज्याच्या विविध भागातून भाविक व यात्रेकरू श्रीक्षेत्र मौजे सुकेणेत डेरेदाखल झाले आहेत. मौजे सुकेणे ग्रामपंचायतीच्या वतीने यात्रेकरू भाविकांना जागा, पाणी, व्यवस्था तसेच बाणगंगा नदी पात्राची स्वच्छता करून दरवर्षीप्रमाणे नदीपात्रातही रहाट पाळणे, व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून देण्यात अशी माहिती सरपंच वृषाली भंडारे व ग्रामविकास अधिकारी एस. जी. सनेर यांनी दिली. दत्त मंदिर संस्थानाच्या पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे.
यात्रेसाठी बाणगंगा नदीपात्रात यंदाही मोठमोठी आकाश पाळणे दाखल झाले आहेत. चार दिवसांच्या यात्रेत लाखोंची उलाढाल होत असते. सुकेणेत चैतन्य पर्व निर्माण झाले आहे.
महाराष्ट्रात महानुभाव पंथीयांच्या जाळीचा देव, माहूर, फलटण या स्थानानंतर श्री क्षेत्र मौजे सुकेणे मंदिराचा समावेश होतो. गंगातीर भ्रमण करतांना चक्र धर स्वामींचा एक दिवसाचा मुक्काम मौजे सुकेणे येथे होता. सुकेणेकर संत परंपरा याठिकाणी असून या यात्रेला पेशवे कालीन परंपरा आहे. दत्त प्रभू पालखीपुढे उधळणारा रंग हा प्रसाद म्हणून भाविक अंगावर घेतात. अशी येथे श्रद्धा आहे.
रोडरोमियो तसेच टवाळखोरांची हयगय केली जाणार नाही. यात्रोत्सव काळात नागरीकांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सहकार्य करावे.
- भगवान मथुरे,
पोलिस निरीक्षक, सुकेणे पोलिस दुरक्षेत्र.