डी.टी.एड.,बी एड विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 02:31 PM2018-12-31T14:31:03+5:302018-12-31T14:34:24+5:30

शिक्षक बेरोजगार विद्यार्थी डी.टी.एड.,बी एड असोशिएशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष व शिक्षण अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे त्यांच्या दालनात उपस्थित नसल्याने आंदोलकांंनी त्यांच्या खुचीर्ला निवेदन चिटकवून ठिय्या आंदोलनासह घोषणाबाजी केली.

Datu agitation in the room of District Council President of D.E. Ed., B. Ed | डी.टी.एड.,बी एड विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात ठिय्या आंदोलन

डी.टी.एड.,बी एड विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात ठिय्या आंदोलन

Next
ठळक मुद्देशिक्षक बेरोजगार विद्यार्थी डी.टी.एड.,बी एड असोशिएशनचे आंदोलन जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात आंदोलकांचा ठिया अध्यक्षांच्या खुर्चीला निवेदन चिटकवून मागण्यांसाठी घोषणाबाजी

नाशिक :  शिक्षक बेरोजगार विद्यार्थी डी.टी.एड.,बी एड असोशिएशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष व शिक्षण अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे त्यांच्या दालनात उपस्थित नसल्याने आंदोलकांंनी त्यांच्या खुचीर्ला निवेदन चिटकवून ठिय्या आंदोलनासह घोषणाबाजी केली. 
आंदोलकानी शिक्षक भरतीच्या मागणीसाठी घोषणाबाजी करताच जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण बैठकीत जिल्हा परिषद शाळांमधील सर्व रिक्त पदे पवित्र पोर्टलमार्फत भरण्याविषयी व प्रशासकीय मान्यता मिळविण्यासाठी ठराव मंजूर करावा, नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या १०० टक्के रिक्त पदांची माहिती शासनाने निश्चित केलेल्या कालमयार्देत पवित्र पोर्टलवर भरण्यात यावी, तसेच बिंदू नामावलीही विहित कालमयार्देत अद्यावत करावी यासह नाशिक जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या उच्च प्राथमिक स्तरावरील सहावी ते आठवी पर्यंतच्या विषय शिक्षकांची गणित, भाषा, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र अशी सर्व रिक्त पदे पवित्र पोर्टलवर अपलोड करण्याची मागणी आंदोलकांनी केली. दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे सुचनेनुसार प्रशासनाने बेरोजगार विद्यार्थ्यांची मागणी मान्य करीत महिनाभरात पवित्र पोर्टलवरील माहीतीची पूर्तता करण्यासोबत  बिंदू नामावलीही अद्यावत करण्याचे आश्वासन दिल्याने महिनाभरासाठी आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे  डी.टी.एड.,बी एड असोशिएशनचे नाशिक शहराध्यक्ष योगेश गांगुर्डे यांनी सांगीतले. यावेळी प्रा. राम जाधव, अभिजित थोरात, शंकर घारे, अमोल नाडेकर, ऋषिकेश घरटे, शलैंद्र पवार, ज्योती सुरसे, तृप्ती पुंड, माधुरी कांगणे शिक्षक बेरोजगार विद्यार्थी डी.टी.एड.,बी एड असोशिएशन पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Web Title: Datu agitation in the room of District Council President of D.E. Ed., B. Ed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.