डे केअर सेंटर कनिष्ठ महाविद्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:11 AM2021-06-22T04:11:20+5:302021-06-22T04:11:20+5:30
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राध्यापिका सारिका पारखी यांनी प्रास्ताविक केले . यानंतर इयत्ता बारावीच्या विज्ञान शाखेच्या कशिश बडगुजर या विद्यार्थिनीने ...
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राध्यापिका सारिका पारखी यांनी प्रास्ताविक केले . यानंतर इयत्ता बारावीच्या विज्ञान शाखेच्या कशिश बडगुजर या विद्यार्थिनीने सुरुवातीला वॉर्म अप व सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक केले. अक्षता देशपांडे या बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थिनीने , दहावीतील मयूर सोनवणे ,आकांक्षा ठाकरे, देवव्रत गिते , नववीतील ओवी कुलकर्णी, व तिची आई गौरी कुलकर्णी आणि शिक्षकांपैकी अनुजा पाठक, वासंती पाठक यांनी योगासनांची प्रात्यक्षिके केली. विद्यार्थ्यांसोबत सर्व शिक्षकांनी योग प्रात्यक्षिके केली. वाणिज्य विभागातील ऐश्वर्या ठाकूर या विद्यार्थिनीने योग जीवनाची गुरुकिल्ली यावर आधारित माहिती दिली. तसेच अक्षता देशपांडे या विद्यार्थिनीने याेगाचे महत्त्व सांगितले. प्राचार्य शरद गिते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आभार, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका कांचन घुगे यांनी केले.