भरदिवसा दरोड्याच्या प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 01:15 AM2017-08-22T01:15:12+5:302017-08-22T01:15:35+5:30
येथील नायगाव रस्त्यावर असलेल्या बंगल्यात घुसून अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या गळ्यावर धारधार शस्त्राने गंभीर वार केले. भरदिवसा दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे शहर हादरले आहे. या घटनेत नाशिकरोड-देवळाली बॅँकेच्या येथील शाखेत कॅशिअर असलेल्या नीलिमा मनोहर शेलार (५४) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सिन्नर : येथील नायगाव रस्त्यावर असलेल्या बंगल्यात घुसून अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या गळ्यावर धारधार शस्त्राने गंभीर वार केले. भरदिवसा दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे शहर हादरले आहे. या घटनेत नाशिकरोड-देवळाली बॅँकेच्या येथील शाखेत कॅशिअर असलेल्या नीलिमा मनोहर शेलार (५४) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येथील नाशिकरोड-देवळाली व्यापारी बॅँकेत कॅशिअर असलेल्या निलीमा शेलार दुपारच्या सुटीत जेवणासाठी नायगाव रस्त्यावरील त्यांच्या श्रीनिवास बंगल्यावर दुचाकीहून गेल्या होता. गाडी बंगाल्याबाहेर लावून घराचे कुलूप उघडून त्या स्वयंपाकघरात जाताच अज्ञात तीन चोरटे त्यांच्यापाठोपाठ बंगल्यात शिरले. चोरट्यांनी स्प्लेंडर मोटारसायकल (क्र. एमएच ४१ पी ६७५४) बंगल्याबाहेर लावली होती. चोरट्यांनी स्वयंपाकघरात प्रवेश करुन नीलिमा शेलार यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर धारधार शस्त्राने त्यांच्या गळ्यावर वार केला. यात शेलार गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या बोटांनाही गंभीर इजा झाल्याचे समजते. त्यानंतर चोरट्यांनी घरातील कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त केले. चोरट्यांनी बंगल्यातून काय चोरून नेले याचा तपशील मिळू शकला नाही.
शेलार दुपारी एकट्याच घरी होत्या. पती मनोहर शेलार वावी येथे गेले होते, तर मुलगा विकी कारखान्यात गेला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, सहाय्यक निरीक्षक निसार सय्यद यांच्यासह पोलीस कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही तपासणीचे व चोरट्यांना शोधण्याचे काम सुरु होते. चोरट्यांनी स्प्लेंडर दुचाकी घटनास्थळी टाकून पळ काढल्याने पोलिसांनी दुचाकी जप्त केली आहे. सायंकाळी ठसे तज्ज्ञ व श्वानपथक पाचारण करण्यात आले होते. चोरट्यांनी नेमके काय चोरुन नेले हे समजू शकले नाही. मात्र भरदिवसा नायगाव रस्त्यावर गजबजलेल्या ठिकाणी दरोड्याचा प्रयत्न झाल्याने शहर हादरले आहे.
गंभीर जखमी नीलिमा शेलार बंगल्याबाहेर पळत येऊन एका पिठाच्या गिरणीत गेल्या व मदतीसाठी आवाज दिला. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी गर्दी केली. तोपर्यंत चोरटे स्वयंपाकघराचा दरवाजा उघडून संरक्षण भिंतीवरून उड्या मारुन पसार झाले होते. परिसरातील नागरिकांनी जखमी शेलार यांना तातडीने शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र गळ्याला खोलवर गंभीर दुखापत असल्याने डॉक्टरांनी त्यांना नाशिकला हलविण्याचा सल्ला दिला. त्यांना तातडीने नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.