पाटोदा गावांतर्गत रस्त्यांची दैनावस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 10:07 PM2019-08-04T22:07:22+5:302019-08-04T22:07:56+5:30
पाटोदा : येवला तालुक्यातील पाटोदा गावातील सर्वच रस्त्यांची अतिशय दुर्दशा झाली आहे. ग्रामपंचायतीने विविध योजना राबवुन पाटोद्यातील रस्त्यांचे सिमेंट कॉक्र ेटीकरण करण्यात आले होते. परंतु या सर्वच रस्त्यांची सुरु असलेल्या पावसाने अतिशय दयनीय अवस्था झाली आहे.
पाटोदा : येवला तालुक्यातील पाटोदा गावातील सर्वच रस्त्यांची अतिशय दुर्दशा झाली आहे. ग्रामपंचायतीने विविध योजना राबवुन पाटोद्यातील रस्त्यांचे सिमेंट कॉक्र ेटीकरण करण्यात आले होते. परंतु या सर्वच रस्त्यांची सुरु असलेल्या पावसाने अतिशय दयनीय अवस्था झाली आहे.
गेल्या चार ते पाच दिवसापासून सुरु असलेल्या रिमझिम पावसामुळे सर्वत्र दलदलीचे साम्राज्य पसरले आहे. सर्वच रस्ते निसरडे झाल्यामुळे ग्रामस्थांना या दलदलीतून मार्ग काढणे अवघड झाले आहे. तसेच प्राथमिक शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ पाणी साचल्याने विध्यार्थांना शाळेत ये जा करण्यासाठी अडचणी येत आहे.
पाटोदा येथे आरोग्य केंद्र असुन आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ पाणी साचल्याने व संपूर्ण परिसर चिखलमय झाल्याने रु ग्णांना आरोग्य केंद्रात उपचार व तपासणीसाठी जाता येतांना मोठी कसरत करावी लागत असल्याने रु ग्णांचे हाल होत आहे.
रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा अंदाज येत नसल्याने खड्यात घसरून लहानमोठे अपघात घडत आहे. ग्रामपंचायतिने या गावांतर्गत रस्त्यांची तात्काळ दुरु स्ती करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विलास पवार यांनी केली आहे.
चौकट....
पाटोदा गावातील सर्व रस्त्यांची दैनावस्था झाली असल्याने सर्वत्र पाणी साचले असून संपूर्ण रस्त्यांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले असल्याने ग्रामस्थांना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने ग्रामपंचायतीने या गावांतर्गत रस्त्यांवर मुरूम टाकून डागडुजी करावी.
- विलास पवार, ग्रामस्थ पाटोदा.
(फोटो ०४ पाटोदा, ०४ पाटोदा १)