वाघ महाविद्यालयात ‘डेज’ची धम्माल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 18:39 IST2020-01-29T18:37:17+5:302020-01-29T18:39:06+5:30

पिंपळगाव बसवंत : परिसरातील क. का. वाघ महाविद्यालयात सुरू असलेल्या वार्षिक स्नेहसंमेलना निमित्ताने बुधवारी (दि.२९) साडी व टाय डे जल्लोषात आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला, मात्र महाविद्यालयातील पार्किंगच्या जागेवर खाद्यपदार्थाचे स्टॉल लावण्यात आल्याने विद्यार्थ्यांना आपली वाहन बाहेर रस्त्यावरच लावावी लागली परिणामी नॅशनल महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने डेजची धमाल पण वाहतूक कोंडीने वाहनचालक झाले बहाल अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

'Daze's Dumble' at Tiger College | वाघ महाविद्यालयात ‘डेज’ची धम्माल

महाविद्यालयातील वाहन पार्किंगच्या जागेवर खाद्यपदार्थचे स्टोल लावल्याने विद्यार्थ्यांना आपली वाहने बाहेर पार्क करावी लागल्यामुळे झालेली वाहतूक कोंडी.

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : वाहनांच्या गर्दीने महामार्ग झाले जॅम

पिंपळगाव बसवंत : परिसरातील क. का. वाघ महाविद्यालयात सुरू असलेल्या वार्षिक स्नेहसंमेलना निमित्ताने बुधवारी (दि.२९) साडी व टाय डे जल्लोषात आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला, मात्र महाविद्यालयातील पार्किंगच्या जागेवर खाद्यपदार्थाचे स्टॉल लावण्यात आल्याने विद्यार्थ्यांना आपली वाहन बाहेर रस्त्यावरच लावावी लागली परिणामी नॅशनल महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने डेजची धमाल पण वाहतूक कोंडीने वाहनचालक झाले बहाल अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
निफाड तालुक्यातील सर्वात मोठे महाविद्यालय असल्याने या ठिकाणी तालुक्यातील बहुतांश विद्यार्थी शिक्षण घेत आहे. मात्र या महाविद्यालयातील सुविधांचा अभाव दिसून येत आहे. महाविद्यालयात सुरू असलेल्या वार्षिक स्नेहसंमेलना निमित्ताने साडी व टाय डे साजरा करण्यात आला. त्यात विद्यार्थ्यांनी धमाल केली.
पण पार्किंगच्या ठिकाणी खाद्यपदार्थचे स्टॉल लावल्याने विद्यार्थीना आपली वाहने थेट महामार्गाच्या कडेला लावावी लागली. त्यामुळे संपूर्ण रस्ता ब्लॉक झाला व विद्यार्थीचा हिरमोड होऊन त्यांना घरचा रस्ता धरावा लागला. त्यामुळे वर्षभरापासून वार्षिक स्नेहसंमेलनसाठी आतूरतेने वाट पाहत असलेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या या नियोजनाबाबत नाराजी व्यक्त केली. तर काहींनी वाहन लावण्यास जागा नसिल्याने भितीपोटी लगेचच घरी जाणे पसंत केले.

उड्डाणपूलाचे काम सुरू असताना महामार्गाच्या कडेला विद्यार्थीनींना वाहन पार्किंग करायला लागली त्यामुळे त्या अवैध पार्किंगमुळे वाहतूक कोंडीचा नागरिकांना सामना करावा लागला.

Web Title: 'Daze's Dumble' at Tiger College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.