हरसुलला लवकरच डीसीएच सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:14 AM2021-05-11T04:14:27+5:302021-05-11T04:14:27+5:30
आतापर्यंत ४५ वयोगटापुढील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू होते. आता १८ ते ४४ वयोगटातील युवकांना व नागरिकांना लसीकरण केले ...
आतापर्यंत ४५ वयोगटापुढील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू होते. आता १८ ते ४४ वयोगटातील युवकांना व नागरिकांना लसीकरण केले जात आहे. या लसीकरणावेळी त्र्यंबक पंचायत समितीचे माजी सभापती तथा विद्यमान सदस्य रवींद्र भोये यांनी चहा-पाणी व नाश्त्याची मोफत सोय केली आहे. या केंद्रावर कोव्हॅक्सिनचे १००० डोस आले होते. हरसुल ग्रामीण रुग्णालयात स्वॅबची रॅपिड अँटिजन टेस्ट आरटीपीसीआर टेस्टदेखील केली जाते. याशिवाय रुग्णालयात दररोज येणारे अन्य रुग्ण, गरोदर माता तपासणी यांचेही प्रमाण अधिक आहे. घाट रस्ता असल्याने अपघाताचे प्रमाण जास्त आहे. अत्यवस्थ स्थितीतील रुग्णांना नाशिक येथे नेण्यासाठी १०२ क्रमांकाची रुग्णवाहिका नसल्याने अडचण निर्माण होत असते. यासाठी १०२ क्रमांकाची रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
फोटो - १० हरसूल कोविड
===Photopath===
100521\10nsk_24_10052021_13.jpg
===Caption===
फोटो - १० हरसूल कोविड