नांदुरमधमेश्वरमधील मृतसाठा संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 06:26 PM2019-05-02T18:26:42+5:302019-05-02T18:27:09+5:30

लासलगावसह सोळा गाव पाणी योजनेला पाणी पुरवठा करणाऱ्या नांदुरमध्मेश्वर धरणात असलेला पाण्याचा मृतसाठा देखील संपल्यावर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला आठ दिवसाआड पाणीपुरवठा बंद पडला असुन त्वरित पाणी सोडण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी मांढरे व निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्याकडे करण्यात आली आहे.

The dead body of Nandurmeshmeshwar ends | नांदुरमधमेश्वरमधील मृतसाठा संपुष्टात

नांदुरमधमेश्वरमधील मृतसाठा संपुष्टात

Next
ठळक मुद्दे्र पाणीटंचाई : १६ गाव पाणीपुरवठा योजना पाईपलाईन कुचकामी

लासलगाव : लासलगावसह सोळा गाव पाणी योजनेला पाणी पुरवठा करणाऱ्या नांदुरमध्मेश्वर धरणात असलेला पाण्याचा मृतसाठा देखील संपल्यावर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला आठ दिवसाआड पाणीपुरवठा बंद पडला असुन त्वरित पाणी सोडण्यात यावे अशी मागणी
जिल्हाधिकारी मांढरे व निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्याकडे करण्यात आली आहे.
कडक उन्हाळा सुरू असल्याने बोअरवेल्स आटल्याने तसेच लासलगाव विंचूर सह 16 गाव पाणीपुरवठा योजनेला पाणीपुरवठा करणार्या नांदूर-मधमेश्वर बंधार्यातील पाणी साठा संपुष्टात आल्याने लाभार्थी गावांना सात ते आठ दिवस आड पाणीपुरवठा केला जात होता.
लासलगाव विंचूर या दोन प्रमुख गावांसह सोळा गाव पाणीपुरवठा योजना नांदूरमधमेश्वर बंधार्यावरून करण्यात आलेली आहे. यंदाच्या उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई लाभार्थी गावांना जाणवू लागली आहे नांदूर मधमेश्वर बंधार्यातील पाणी साठा आता संपुष्टात आलेला असल्याने पाणीपुरवठा समितीच्या वतीने बंधाºयातील मोटारी पुढे हलविण्यात आल्या असून पाणीसाठा संपुष्टात आल्याने सात ते आठ दिवस आड लाभार्थी गावांना पाणीपुरवठा केला जात होता. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची चणचण भासत आहे.
योजनेच्या वारंवार फुटणाºया पाईपलाईनमुळे परिसराला विनाकारण सलग काही दिवस नळांना पाणी देता येत नाही. आता तर नांदुरमध्मेश्वर धरणात पाणीच नाही. परंतु ज्यावेळी मुबलक पाणी असते तरीही नाहक टंचाईच्या परिस्थितीला सामोरे जावे लागते. . या विनाकारण टंचाईच्या अवकळा कमी होण्याकरिता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद नाशिक याच्याकडे सदर योजनांची पाईपलाईन गळती दुरु स्तीसाठी लासलगाव ग्रामपंचायतीने दुरु स्ती प्रस्ताव सादर केलेला आहे परंतु सुस्त प्रशासन प्रस्तावास मान्यता देऊन निधी उपलब्ध करु न देत नसल्याचा आरोप पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष जयदत्त होळकर यांनी केला आहे.
लासलगाव विंचूरसह सोळा गाव पाणीपुरवठा योजना ही सन २०१० पासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचेकडून समतिीस हस्तांतरित करण्यात आली. सादर योजनांची पाईपलाईन १५ ते २० वर्षा पूर्वी टाकण्यात आलेली होती ती अतिशय जीर्ण व खराब झालेली असून सदर पाईप लाईन हि कायम फुटत असते. लासलगाव पाणी पुरवठा समितीस सदरच्या पाईपलाईनची गळती थांबविण्यासाठी फारमोठ्या प्रमाणावर खर्च येतो लोखंडी पाईपलाईन असल्याने जे. सी. बी. द्वारे खोदाई करून वेल्डीग मशीनने गळती काढावी लागते. गळती काढण्याकरिता पूर्ण पाईपलाईन हि रिकामी करावी लागते. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यव होतो गळती काढले नंतर पुनश्च पाईप लाईन भरण्यासाठी पाच ते सहा तास लागतात त्यामुळे विनाकारण वीज जळते त्यामुळे विनाकारण वीज बिलातही वाढ होते एवढा भुर्दंड सोळा गाव पाणी पुरवठा योजना समिती सहन करते गळती मुळे नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा करणे अशक्य होते महिला वर्गामध्ये ग्रामपंचायत प्रशासना बद्दल असंतोष निर्माण होतो यामध्ये ग्रामपंचायतीचा काही एक दोष नसतांना विज पुरवठा खंडीत होत असल्याने व पाईप लाईन वारंवार फुटत असल्याने गेली दिवस विस्कळीत होत आहे.

Web Title: The dead body of Nandurmeshmeshwar ends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.