अकरावी प्रवेशासाठी १३ फेब्रुवारीपर्यंत मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:14 AM2021-02-07T04:14:05+5:302021-02-07T04:14:05+5:30
अकरावी प्रवेशासाठी संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना अलाॅटमेंट जाहीर होईल. त्यानंतर १३ फेब्रुवारीपर्यंत प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी लागेल.शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांतील ...
अकरावी प्रवेशासाठी संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना अलाॅटमेंट जाहीर होईल. त्यानंतर १३ फेब्रुवारीपर्यंत प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी लागेल.शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांतील कला, वाणिज्य, विज्ञान आणि संयुक्त शाखांसाठी ही प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली. अकरावीचे वर्ग असलेल्या शहरातील ६० महाविद्यालयांत तिन्ही शाखा मिळून २५२७० जागा उपलब्ध असून त्यापैकी १९५०१ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी यंदा तीन नियमित फेऱ्या पार पडल्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी दोन विशेष फेऱ्या राबविण्यात आल्या. सात फेऱ्या पार पडल्यानंतर अकरावीची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली. सर्व फेऱ्या मिळून १९४९७ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. तर ५ हजार ७७३ जागा रिक्त आहेत. कला आणि वाणिज्य शाखेच्या तुलनेत यंदाही विज्ञान शाखेमध्ये सर्वाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.
इन्फो-