पहिल्या फेरीच्या अर्जासाठी आज अखेरची मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:48 AM2018-06-25T00:48:48+5:302018-06-25T00:49:06+5:30
नाशिक : अकरावीच्या प्रवेशप्रक्रि येचा भाग-२ भरण्यासाठी ११ जूनपासून सुरुवात झाली असून, ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग-१ व भाग २ भरून प्रक्रिया पूर्ण केली आहे, अशा विद्यार्थ्यांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी २९ जूनला जाहीर करण्यात येणार आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही प्रवेश अर्जाचा भाग १ भरलेला नाही, अशा विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीत सहभागी होण्यासाठी सोमवारी (दि.२५) अखेरची मुदत असून, त्यांना सायंकाळपर्यंत अर्ज करणे अनिवार्य आहे. अन्यथा त्यांना दुसऱ्या गुणवत्ता यादीची आणि पर्यायाने दुसºया फेरीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. महापालिका परिसरातील विविध ५७ महाविद्यालयांमध्ये अकरावीची आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया वेगवेगळ्या फेºयांमध्ये राबविण्यात येत असून, या प्रक्रियेत दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्जाचा भाग-१ व भाग-२ भरणे अनिवार्य आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या दोन्ही प्रक्रि या पूर्ण केल्या नाहीत त्यांना पुढील प्रवेशप्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे अकरावीला प्रवेश घेऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-१ भरून त्याची पडताळणी झाल्यानंतर भाग-२ भरावा लागणार आहे.
सायंकाळपर्यंत मुदत
भाग-२ साठी कोणतीही पडताळणी करावी लागणार नाही. परंतु, या प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना सोमवारी सायंकाळपर्यंत आॅनलाइन प्रवेश अर्जाचा भाग एक व भाग दोन पूर्णपणे भरून सादर करावा लागणार आहे.