प्रथम फेरी प्रवेशासाठी आज अखेरची मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 01:17 AM2019-07-16T01:17:39+5:302019-07-16T01:18:51+5:30
अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेंतर्गत पहिल्या यादीत संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी १४ हजार ८४५ विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत सहा हजार ९६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, प्रथम फेरीतील प्रवेशासाठी मंगळवारी (दि. १६) अखेरची मुदत आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी प्रथम फेरीत पसंतीचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश निश्चित केलेला नाही. त्यांनी मंगळवारी दिवसभरात प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
नाशिक : अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेंतर्गत पहिल्या यादीत संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी १४ हजार ८४५ विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत सहा हजार ९६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, प्रथम फेरीतील प्रवेशासाठी मंगळवारी (दि. १६) अखेरची मुदत आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी प्रथम फेरीत पसंतीचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश निश्चित केलेला नाही. त्यांनी मंगळवारी दिवसभरात प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्र्रक्रियेत आतापर्यंत पहिल्या यादीत संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी १४ हजार ८४५ विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत ६ हजार ९६ विद्यार्थ्यांचे प्रवेश घेतले असून, यात कला शाखेतील ९९३, वाणिज्याच्या दोन हजार ३१६, विज्ञानच्या दोन हजार ६३२, तर एमसीव्हीसीचे १५५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अकरावी प्रवेशासाठी शनिवारपासून प्रत्यक्ष प्रवेश देण्याचे काम सुरू मंगळवारी प्रथम फेरीतील प्रवेशासाठी शेवटची मुदत आहे. अकरावीच्या शहरात २३ हजार ८६० जागा उपलब्ध असून, पहिल्या यादीत कला शाखेतील २ हजार ५६३, वाणिज्य शाखेच्या ५ हजार ६२९, तर विज्ञान शाखेच्या ६ हजार ३९६ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली होती. त्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले नसल्याने दुसऱ्या फेरीसाठी प्रतीक्षा करणाºया विद्यार्थ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीतल क टआॅफ आणि दुसºया फेरीसाठी उपलब्ध जागांची माहिती १६ जुलैला सायंकाळी मिळणार आहे.
दुसºया फेरीपूर्वी १७ व १८ जुलैला आॅनलाइन अर्जाचा भाग एक व दोनमध्ये बदल करता येणार असून, त्यात विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे पर्याय आणि शाखांचे पर्यायही बदलता येणार आहे.