मुक्त विद्यालयाच्या प्रवेश अर्जासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:23 AM2021-02-06T04:23:51+5:302021-02-06T04:23:51+5:30

नाशिक : राज्य मुक्त विद्यालय मंडळाने सुरुवातीला मुक्तपणे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नावनोंदणी प्रक्रियेची अंतिम मुदत वाढवून दिली असून, आता ...

Deadline for open school admission application is 28th February | मुक्त विद्यालयाच्या प्रवेश अर्जासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत

मुक्त विद्यालयाच्या प्रवेश अर्जासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत

Next

नाशिक : राज्य मुक्त विद्यालय मंडळाने सुरुवातीला मुक्तपणे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नावनोंदणी प्रक्रियेची अंतिम मुदत वाढवून दिली असून, आता या विद्यार्थ्यांना २८ फेब्रुवारीपर्यंत नावनोंदणी करता येणार आहे.

राज्य मुक्त विद्यालय मंडळाने यापूर्वी मुक्तपणे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नावनोंदणी प्रक्रियेसाठी ३१ डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत दिली होती. त्यानंतर शिक्षण मंडळातर्फे या मुदतीत ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. ही मुदत संपल्यानंतर पुन्हा एकदा मुक्त विद्यालय मंडळातर्फे नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली असून, याअंतर्गत पाचवी आणि आठवीसाठी नव्याने प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना १ ते २८ फेब्रुवारी २०२० पर्यंत ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज करता येणार आहे. या मंडळांंतर्गत दहा वर्षे पूर्ण झालेले विद्यार्थी पाचवी, तेरा वर्षे पूर्ण झालेले विद्यार्थी आठवी आणि पंधरा वर्षे पूर्ण झालेले विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट होऊ शकतील. १४ वर्षांखालील मुलांची मुक्त विद्यालय केंद्राचे नियमित विद्यार्थी म्हणून नोंद करण्यात येते. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता या विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी मुक्त विद्यालय मंडळाच्या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन राज्य शिक्षण मंडळातर्फे करण्यात आले आहे. दिव्यांग किंवा शाळेत न जाता विद्यार्थ्यांना शालेय परीक्षा देता यावी, यासाठी राष्ट्रीय मुक्त विद्यालय मंडळाच्या धर्तीवर दोन वर्षांपासून राज्याचे मुक्त विद्यालय मंडळ सुरू करण्यात आले असून, या मंडळाच्या माध्यमातून २८ फेब्रुवारीपर्यंत संबंधित विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे.

नावनोंदणीची प्रक्रिया

ऑनलाइन नावनोंदणी करणे - १ ते २८ फेब्रुवारी

विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, शुल्क, मूळ कागदपत्र नमूद केलेल्या केंद्रात जमा करणे - २ फेब्रुवारी ते ३ मार्च

केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, शुल्क व कागदपत्रे विभागीय मंडळाकडे सादर करणे - ५ मार्च

Web Title: Deadline for open school admission application is 28th February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.