आरटीई प्रवेशासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:11 AM2021-07-24T04:11:32+5:302021-07-24T04:11:32+5:30
नाशिक : आरटीई प्रवेशप्रक्रियेंतर्गत सोडतीद्वारे निवड झालेल्या ४ हजार २०८ विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रिया करण्यासाठी तिसऱ्या दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. ...
नाशिक : आरटीई प्रवेशप्रक्रियेंतर्गत सोडतीद्वारे निवड झालेल्या ४ हजार २०८ विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रिया करण्यासाठी तिसऱ्या दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यस्तरीय लॉटरी प्रक्रियेत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांचे ३१ जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहेत.
आरटीईअंतर्गत नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ९) सायंकाळपर्यंत ३ हजार ४० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, अजूनही १ हजार १६८ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळूनही त्यांनी प्रवेश घेतलेले नाही. या विद्यार्थ्यांच्या पालकांना वाढीव मुदतीत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. नाशिक जिल्ह्यात आरटीई प्रक्रियेंतर्गत आतापर्यंत ३ हजार ४० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. यापूर्वी पहिल्यांदा ३० जूनपर्यंतची प्रवेशाची मुदत संपल्यानंतर पहिल्यांदा ९ जुलैपर्यंत व त्यानंतर आता दुसऱ्यांदा २३ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात होती. शुक्रवारी दुसऱ्यांदा वाढवून देण्यात आलेली मुदत संपल्यानंतर शिक्षण विभागाने प्रवेश निश्चित करू न शकलेल्या पालकांना तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे.त्यामुळे संधी मिळूनही प्रवेश घेऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांचे पालक ३१ जुलैपर्यंत त्यांचे पाल्यांचे प्रवेश निश्चित करू शकणार आहे. दरम्यान, आरटीई प्रवेशप्रक्रियेंतर्गत राज्यस्तरावरून सोडत जाहीर झाल्यानंतर कोरोनामुळे प्रवेशप्रक्रिया सुरू होण्याला विलंब झाला आहे. त्यामुळे निश्चित मुदतीत प्रवेशप्रक्रिया पूर्ण करू न शकणाऱ्या पालकांना मुदतवाढ मिळाली असून, वाढीव मुदत संपल्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत असली तरी शिक्षण विभागाकडून प्रवेशप्रक्रियेला वारंवार दिल्या जाणाऱ्या मुदतवाढीमुळे प्रतीक्षेतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी केव्हा मिळणार? मिळणार की नाही याविषयी प्रतीक्षेतील विद्यार्थ्यांच्या पालकांकडून उपस्थित केला जात आहे.