अर्जात दुरुस्तीसाठी आज अखेरची मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 01:40 AM2019-06-11T01:40:00+5:302019-06-11T01:40:16+5:30
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेशासाठी पहिल्या फेरीची मुदत दि.१० मे रोजी संपल्यानंतर तब्बल महिनाभराचा कालावधी उलटूनही अद्याप दुसऱ्या सोडतीविषयी कोणतीही सूचना शिक्षण विभागाकडून नसल्याने पहिल्या फेरीत प्रवेशाची संधी न मिळालेल्या १२ हजार विद्यार्थ्यांच्या पालकांना दुसºया सोडतीची प्रतीक्षा लागली आहे.
नाशिक : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेशासाठी पहिल्या फेरीची मुदत दि.१० मे रोजी संपल्यानंतर तब्बल महिनाभराचा कालावधी उलटूनही अद्याप दुसऱ्या सोडतीविषयी कोणतीही सूचना शिक्षण विभागाकडून नसल्याने पहिल्या फेरीत प्रवेशाची संधी न मिळालेल्या १२ हजार विद्यार्थ्यांच्या पालकांना दुसºया सोडतीची प्रतीक्षा लागली आहे. गेल्या महिनाभराच्या कालावधीत पहिल्या फेरीची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आॅनलाइन अर्जात दुरुस्ती करण्यासाठी दोनदा मुदत वाढ देण्यात आली असून, मंगळवारी (दि.११) ही मुदत संपणार असल्या आतातरी दुसरी सोडत जाहीर होणार का? असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
आरटीई अंतर्गत राखीव २५ टक्के जागांपैकी नामांकित शाळांमध्ये आपल्या पाल्यांना प्रवेश मिळावा यासाठी आॅनलाइन अर्जात खोटे पत्ते व चुकीच्या जन्मतारखा नोंदविल्याचा प्रकार उघड झाल्यानंर प्र्राथमिक शिक्षण संचालनालयाने गंभीर दखल घेत दुसरी सोडत जाहीर करण्यापूर्वी ज्या पालकांनी आॅनलाइन अर्जात खोटे पत्ते नोंदविले आहे, अशा पालकांना अर्जात बदल करण्याची संधी नाकारली आहे. आरटीई प्रवेशप्रक्रियेतील पहिली लॉटरी ८ एप्रिल रोजी काढण्यात आल्यानंतर प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दुसºया सोडतीपूर्वी पालकांना आॅनलाइन अर्जांमध्ये दुरुस्ती व फेरबदल करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. यात ज्या पालकांनी अर्ज भरला, परंतु निश्चित (कन्फर्म) केला नाही. त्यांना तो निश्चित करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी दुसऱ्यांदा वाढवून दिलेली मुदत मंगळवारी संपणार आहे. त्यामुळे मंगळवारी अखेरच्या दिवशी ज्या पालकांना पहिली लॉटरी लागली नाही. अशा पालकांना त्यांचे गुगल लोकेशन चुकले असल्यास ते दुरु स्त करता येणार आहे.
गुगल लोकेशन दुरुस्त केल्यानंतर शाळांची निवड नव्याने करणे आवश्यक आहे. मात्र अशा पालकांना त्यांच्या पाल्यांची जन्मतारीख व नावात बदल करता येणार नसल्याचे संचालनालयाने स्पष्ट केले असून, ज्या पालकांना पहिल्या फेरीत लॉटरी लागली, परंतु अंतराच्या अडचणीमुळे प्रवेश घेऊ शकले नाही अशाच पालकांच्या तक्रारीची खात्री पडताळणी समितीने करणे व पालकांची चूक किंवा तांत्रिक चूक असल्यास गुगल लोकेशन व शाळा निवडीत दुरुस्ती करण्याच्या सूचना संचालनालयाने केल्या आहेत. ज्या पालकांनी घराचे अंतर ३ किमीपेक्षा अधिक असताना जाणीवपूर्वक १ किमीच्या आत दाखविले आहे अशा पालकांना पडताळणी समितीने अपात्र ठरविले आहे. अशा पालकांच्या अर्जामध्ये दुरुस्ती करण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे शिक्षण संचालक सुनील चौहान यांनी सर्व जिल्हा परिषदांचे प्राथमिक शिक्षणाधिकारी व मनपा प्रशासन अधिकाºयांना दिले आहेत.
अर्जामध्ये दुरुस्ती
ज्या पालकांनी घराचे अंतर ३ किमीपेक्षा अधिक असताना जाणीवपूर्वक १ किमीच्या आत दाखविले आहे अशा पालकांना पडताळणी समितीने अपात्र ठरविले आहे. अशा पालकांच्या अर्जामध्ये दुरुस्ती करण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे शिक्षण संचालक सुनील चौहान यांनी सर्व जिल्हा परिषदांचे प्राथमिक शिक्षणाधिकारी व मनपा प्रशासन अधिकाºयांना दिले आहेत.