देवळा बसस्थानकास खासगी वाहनांचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 11:26 PM2019-09-10T23:26:42+5:302019-09-10T23:27:23+5:30
देवळा : येथील बसस्थानकास रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी खासगी वाहनांचा विळखा पडत असल्यामुळे बसस्थानकात येणाऱ्या व जाणाºया बस तसेच प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. अपघात होण्याची शक्यता असल्याने परिवहन विभागाने याबाबत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
देवळा : येथील बसस्थानकास रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी खासगी वाहनांचा विळखा पडत असल्यामुळे बसस्थानकात येणाऱ्या व जाणाºया बस तसेच प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. अपघात होण्याची शक्यता असल्याने परिवहन विभागाने याबाबत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
देवळा हे चौफुलीवर वसलेले शहर असून, येथून राज्य व आंतरराज्य बसेसची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. संपूर्ण नाशिक जिल्ह्यात खड्डेमुक्त बसस्थानक म्हणून पूर्वीपासून या बसस्थानकाची ख्याती आहे. विंचूर-प्रकाशा महामार्गापासून १०० मीटर अंतरावर असलेल्या देवळा बसस्थानकात दिवसभरात ४५० बसेसची ये-जा सुरू असते. नाशिक, नंदुरबार, साक्री, सटाणा, सुरत, पुणे, मुंबई, नगर, धुळे, जळगाव आदी आगारांच्या बसेसची दिवसभर ये-जा सुरू असते. यामुळे बसस्थानक सतत गजबजलेले असते. रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी स्थानकात प्रवाशांची गर्दी असते. आठवडे बाजारासाठी ग्रामीण भागातून ग्रामस्थ मोठ्या संख्येने बाजारहाट करण्यासाठी देवळा येथे येतात. यापैकी अनेकजण आपल्या दुचाकीने येतात. शहरात पार्किंगची सुविधा नसल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या दुचाकी बसस्थानक आवारात उभ्या करतात. यामुळे स्थानक दुचाकींनी भरून जाते.
स्थानकाच्या प्रवेश मार्गावरच अनेक भाजीपाला विक्र ेते वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने रस्ता अडवून बसतात. या प्रवेश मार्गासमोरूनच आठवडे बाजारात जाण्याचा रस्ता असल्यामुळे या ठिकाणी गर्दी असते. पोलीस या ठिकाणी बॅरिकेड्सचा वापर करीत नसल्यामुळे सर्वत्र बेशिस्त निर्माण होते. यामुळे बसचालकांना या गर्दीतूनच वाट काढत स्थानकात प्रवेश करावा लागतो. त्यातच खासगी वाहनेदेखील स्थानकात ये-जा करतात. यामुळे येणाºया व
जाण्याºया बसला अडथळे निर्माण होतात. परिवहन महामंडळ विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे नागरिकांसह प्रवाशांची गैरसोय होत आहे.पार्किंगची व्यवस्था करण्याची मागणीस्वच्छ व सुंदर देवळा या संकल्पपूर्तीकडे वाटचाल करीत असलेल्या देवळा नगरपंचायतीच्या वतीने शहरात विविध विकासकामे सुरू आहेत. यामुळे शहराचे रूप पालटू लागले आहे. शहराचे होत असलेले विस्तारीकरण व वाहनांची वाढती संख्या पाहता शहरात पार्किंगसाठी लवकरात लवकर जागा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. कारण शहरातील सुभाष चौक, पाच कंदील, बसस्थानक परिसरात वाहनचालक आपली वाहने बेशिस्तपणे उभी करतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. देवळा नगरपंचायत प्रशासनाने शहरातील पार्किंगचा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.