दिंडोरीतील नगरपंचायतीच्या कर्मचाºयांना महागाई भत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 10:58 PM2020-01-11T22:58:10+5:302020-01-12T01:19:03+5:30
नगराध्यक्षांनी दिलेल्या आश्वासनानंतर दिंडोरी नगरपंचायत कर्मचाºयांनी उपोषण सोडले आहे. कर्मचाºयांना दहा टक्के महागाई भत्ता देण्याचे नगरपंचायत प्रशासनाने मान्य केले. एप्रिलनंतर १०० टक्के समायोजनावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन मुख्य अधिकारी डॉ. मयूर पाटील यांनी दिले.
दिंडोरी : नगराध्यक्षांनी दिलेल्या आश्वासनानंतर दिंडोरी नगरपंचायत कर्मचाºयांनी उपोषण सोडले आहे. कर्मचाºयांना दहा टक्के महागाई भत्ता देण्याचे नगरपंचायत प्रशासनाने मान्य केले. एप्रिलनंतर १०० टक्के समायोजनावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन मुख्य अधिकारी डॉ. मयूर पाटील यांनी दिले.
गेल्या तीन वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतमध्ये करण्यात आले. मात्र पूर्वीच्या ग्रामपंचायत सेवेत असलेल्या कर्मचाºयांना अद्यापही नगररचना विभागाने सेवेत कायम न केल्याने त्यांची वाताहत झाली आहे. अनेक वर्षे काम करत आलेल्या अशा सर्व कर्मचाºयांना किमान वेतन व १०० टक्के महागाई भत्ता मिळावा यासह विविध मागण्यांसाठी सर्व कर्मचारी संघटनांनी येथील प्रांत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते. तथापि, लोकप्रतिनिधिनी प्रशासनाने वेतनावर १० टक्के वाढ देण्याचे आश्वासन दिल्यानंतर दिंडोरी नगरपंचायत कर्मचाºयांनी उपोषण मागे घेतले. सीटू संघटना प्रणित दिंडोरी नगरपंचायत कर्मचारी संघटनेने शासकीय समावेशन होईपर्यंत शासकीय किमान वेतन फरकासह न मिळाल्याने प्रांत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. नगरपंचायतीतसुद्धा जुनेच वेतन दिले जात आहे. प्रांत डॉ. संदीप आहेर, कैलास मवाळ, ज्येष्ठ नेते चंद्रकांत राजे, मुख्य अधिकारी डॉ. मयूर पाटील यांच्या मध्यस्थीने मागण्यांवर चर्चा झाली. यावेळी नगराध्यक्ष रचना जाधव यांच्या हस्ते कर्मचाºयांना लिंबूपाणी देऊन उपोषण मागे घेण्यात आले.
यावेळी सुधाकर चारोस्कर, दिपक सोळंकी, गोटीराम मेधणे, निर्मला सोळंकी, विजय केदारे, कैलास गांगुर्डे, चिंतामण वाघ, भारत कापसे, रामदास चारोस्कर, रंजना निकम, कमल वाघमारे, माधुरी निकम आदी उपस्थित होते.