शतपावली करणाऱ्या पादचाºयावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 10:10 PM2020-06-02T22:10:27+5:302020-06-03T00:08:24+5:30

नाशिक : शतपावलीसाठी रस्त्याने पायी जाणाºया दुचाकीस्वार त्रिकुटाने चाकूचा वार करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना बिडी कामगारनगर भागातील अमृतधाम परिसरात घडली. हा हल्ला परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी संशयितांनी केल्याचे बोलले जात असून, याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 Death attack on a pedestrian | शतपावली करणाऱ्या पादचाºयावर प्राणघातक हल्ला

शतपावली करणाऱ्या पादचाºयावर प्राणघातक हल्ला

Next

नाशिक : शतपावलीसाठी रस्त्याने पायी जाणाºया दुचाकीस्वार त्रिकुटाने चाकूचा वार करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना बिडी कामगारनगर भागातील अमृतधाम परिसरात घडली. हा हल्ला परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी संशयितांनी केल्याचे बोलले जात असून, याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुजर वर्मा (रा.हनुमानवाडी), विजय पाटील (रा.अमृतधाम) व त्यांचा एक साथीदार अशी संशयित हल्लेखोरांची नावे आहेत. याप्रकरणी गंगाधर पंडितराव आहेर (रा. बिडी कामगारनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. गंगाधर आहे. शनिवारी (दि.३०) जेवण आटोपून गल्लीत फेरफटका मारीत असताना ही घटना घडली. घरानजीकच्या स्ट्रिट लाइट खालून ते पायी जात असताना विनानंबर असलेल्या अ‍ॅक्टिव्हावर आलेल्या त्रिकुटापैकी एकाने पायी चालत असलेल्या आहेर यांच्या कानशिळेत वाजवली, तर दुसºयाने त्यांच्यावर विनाकारण चाकू हल्ला केला. या घटनेत आहेर जखमी झाले असून, संशयितांनी परिसरातील दहशत कायम ठेवण्यासाठी हा हल्ला केल्याचे बोलले जात असून, ते पसार झाले आहेत.
सिडकोत तलवारीने हाणामारी
जुन्या भांडणाच्या कुरापतीतून सिडकोच्या गणेश चौकात रविवारी (दि. ३१) सकाळी दोन कुटुंबात हाणामारी झाली. यात दोन्ही गटांतील युवकांनी तलावारीचा वापर केल्याने दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याप्रकरणी तुषार जगताप (३०, रा. गणेशचौक) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित राजू दळवी, संजय दळवी, कुणाल, रोहित विसे, कृष्णा दळवी, तसेच तीन महिलांनी जगताप यांच्या घरात घुसून जुन्या भांडणाच्या कुरापतीतून जगताप यांच्या कुटुंबीयांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यात कुणाल दळवी याने तलवारीने तुषार याच्या उजव्या दंडावर वार करून जखमी केले. तसेच दरवाजा तोडून घराच्या काचा तसेच गाडीचा दरवाजा तोडला. यामध्ये तुषार जगताप त्याचे कुटुंबीय जखमी झाले, तर राजू भास्कर दळवी (४०, रा. गणेश चौक) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते त्यांच्या घरासमोरील बाकावर बसले असता, संशयित तुषार जगताप, पुंडलिक जगताप, तसेच तुषार जगताप याची आई यांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून तलवारीने दळवी यांच्यावर तसेच कुणाल जाधव यांच्यावर वार केले. तसेच झाड्याच्या कुंड्या व फरशीचे तुकडे फेकून मारून गंभीर जखमी केले.
---------------------
तडीपार गुंडास ठोकल्या बेड्या
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाउन सुरू असल्यामुळे शहरातून हद्दपार करण्यात आलेले गुंड त्यांच्या राहत्या घरी येऊन राहण्याची शक्यता लक्षात घेत गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने अनंत कान्हेरे मैदानाच्या पाठीमागील झोपडपट्टीत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अधारे तपासणी करत शिताफीने चंद्रकांत भरत वाघमारे (३०) यास सापळा रचून ताब्यात घेतले. पोलीस नाईक दिलीप मोंढे यांच्या फिर्यादीवरून मुंबईनाका पोलिसांच्या ताब्यात वाघमारे यास देण्यात आले आहे. या लॉकडाउन काळात एकूण १४ हद्दपार इसमांवर महाराष्टÑ पोलीस कायदा कलम-१४४ नुसार कारवाई करण्यात आली आहे.
------------------------------------
शहरात दोन महिलांचा विनयभंग
 शहरात विनयभंगाचे प्रकार वाढले असून, दोन महिलांचा विनयभंग करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यातील एक महिला वाद मिटविण्यासाठी गेली असता तिचा टोळक्याने विनयभंग केला, तर दुसरीवर चाकू हल्ला करीत कुटुंबीयांनी मायलेकास मारहाण करून महिलेचा विनयभंग केला. या घटनेत महिलेचे मंगळसूत्र आणि रोकड गहाळ झाले असून, याप्रकरणी नाशिकरोड आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
 सिन्नर फाटा भागात घडलेल्या घटनेत महिला आपल्या मुलाच्या अ‍ॅक्टिव्हावर नातेवाईक रुग्णास दवाखान्यात भेटण्यासाठी जात असताना वाटेत मनपा हॉस्पिटलसमोर संशयित इकबाल शेरू शेख, हुसेन फिरोज शेख, अश्पाक शेख व अक्षय धुमाळ आदींचे टोळके महिलेचा भाचा सागर कांबळे यास मारहाण करीत होते. यावेळी वाद मिटविण्यासाठी महिला गेली असता संशयित हुसेन शेख याच्यासह टोळक्याने तिचे केस धरून लाथाबुक्यांनी मारहाण केली, असे पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title:  Death attack on a pedestrian

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक