जिल्ह्यात स्वाइन फ्लूसदृश आजाराने दोघांचा मृत्यू; १६ रुग्णांवर उपचार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 12:25 AM2018-09-13T00:25:08+5:302018-09-13T00:25:41+5:30
नाशिक : जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षामध्ये उपचार सुरू असलेल्या निफाड व मालेगाव तालुक्यातील दोघांचा स्वाइन फ्लूसदृश आजाराने मृत्यू झाला. संदीप भास्कर सोळसे (३०, रा. शिरसगाव, ता. निफाड) व सुरेश सोनू थोरात (४२, रा. आघार खुर्द, ता. मालेगाव) अशी मृत्यु झालेल्या दोघा रुग्णांची नावे असून, आतापर्यंत १८ जणांचा या स्वाइन फ्लूने बळी घेतला आहे़

शिरसगाव येथील रहिवासी सोळसे यांना शनिवारी (दि़ ८) जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ त्यांना निमोनिया झाल्याचे निदान वैद्यकीय तपासणीत समोर आल्याने तसेच त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते़ बुधवारी (दि़१२) मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला़, तर आघार खुर्द येथील थोरात यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याने सोमवारी (दि़१०) सायंकाळी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ व्हेंटिलेटरवर असलेल्या थोरात यांचा बुधवारी (दि़ १२) सकाळी मृत्यू झाला़ जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात १६ रुग्णांवर उपचार सुरू असून, यातील तीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत़, तर उर्वरित १३ रुग्णांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाही़ दरम्यान, या कक्षामध्ये सहा नवीन रुग्ण दाखल झाले आहेत़
जिल्ह्यात स्वाइन फ्लूसदृश आजाराने दोघांचा मृत्यू; १६ रुग्णांवर उपचार सुरूनाशिक : जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षामध्ये उपचार सुरू असलेल्या निफाड व मालेगाव तालुक्यातील दोघांचा स्वाइन फ्लूसदृश आजाराने मृत्यू झाला. संदीप भास्कर सोळसे (३०, रा. शिरसगाव, ता. निफाड) व सुरेश सोनू थोरात (४२, रा. आघार खुर्द, ता. मालेगाव) अशी मृत्यु झालेल्या दोघा रुग्णांची नावे असून, आतापर्यंत १८ जणांचा या स्वाइन फ्लूने बळी घेतला आहे़