बस-दुचाकीच्या धडकेत मुलाचा मृत्यू; तीन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 12:28 AM2018-10-06T00:28:03+5:302018-10-06T00:28:52+5:30
नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर तुपादेवी फाट्याजवळ स्प्लेंडर दुचाकीला एसटी बसची धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक मुलगा ठार, तर तिघेजण जखमी झाले.
त्र्यंबकेश्वर : नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर तुपादेवी फाट्याजवळ स्प्लेंडर दुचाकीला एसटी बसची धडक बसल्याने झालेल्या अपघातात
/>एक मुलगा ठार, तर तिघेजण जखमी झाले.
तळवाडेकडून त्र्यंबककडे येणारी स्प्लेंडर दुचाकी (क्र . एमएच१५ जीजी ६४४३) हायवेवर येऊन त्र्यंबकेश्वरकडे जात असताना त्र्यंबकेश्वरहून नांदगावला जाणाऱ्या बसची (क्र . एमएच १४ बीटी ३३४५) दुचाकीस्वारास जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील सर्वात पुढे बसलेला सोपान आनंदा वाघेरे (१२, रा. विळवंडी, ता. दिंडोरी) व दुचाकी चालकासह तिघेजण जबर जखमी झाले. आनंदा गोपाळ वाघेरे (३७), पांडू सखाराम माळी(६०), संजय उखा वाघेरे (२६) सर्व, रा. विळवंडी, ता.दिंडोरी ही जखमींची नावे आहेत. हे सर्वजण त्र्यंबकेश्वर येथे एकादशीनिमित्त दर्शनासाठी येत होते. सर्व जखमींना त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रु ग्णालयाच्या रु ग्णवाहिकेतून नाशिक येथे पाठविण्यात आले.
त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कैलास आकुले, हवालदार संजय खैरनार, नाईक पवार, भाबड आदी करीत आहेत.