बिबट््याच्या हल्ल्यात बैलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 06:26 PM2019-12-13T18:26:24+5:302019-12-13T18:26:43+5:30
इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुºहे येथील नागरीवस्तीत बिबट्याची दहशत वाढली असून, येथील शेतकरी लालू रंभाजी गुळवे यांच्या घराजवळ बांधलेल्या बैलावर बिबट्याने हल्ला करत त्यास ठार करल्याची घटना गुरु वारी घडली.
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुºहे येथील नागरीवस्तीत बिबट्याची दहशत वाढली असून, येथील शेतकरी लालू रंभाजी गुळवे यांच्या घराजवळ बांधलेल्या बैलावर बिबट्याने हल्ला करत त्यास ठार करल्याची घटना गुरु वारी घडली. बिबट्याच्या हल्ल्यात वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
परिसरात जवळपास एक महिन्यापासून बिबट्याचे वास्तव्य आहे. बिबट्या अधूनमधून नागरिकांना दर्शन देत असून, भविष्यात एखादी मोठी घटना घडू शकते. गेल्या आठवड्यात नांदूरवैद्य येथील रोकडे यांच्या बैलावर बिबट्याने हल्ला चढवत ठार केले होते. परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. परिसरात बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच या ठिकाणी उसाचे क्षेत्र वाढले आहे. यामुळे बिबट्याच्या दहशतीने ग्रामस्थ दिवसाही घराबाहेर पडण्यास घाबरू लागले आहेत. लवकरात लवकर या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.