मृत्यूचा ‘पुकारा’ करणाऱ्याच्या मृत्यूने हळहळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 12:42 AM2018-12-14T00:42:01+5:302018-12-14T00:42:38+5:30
प्रत्येकाचा मृत्यू हा विधीलिखित असतो. शहरात दुचाकीवर फिरून गल्लोगल्ली ‘पुकारा’ करीत मृत्यूची खबर देणाºया ‘पुकारे’लाच मृत्यूने गाठले आणि मृत्यूचा ‘पुकारा’ करणाºया व्यक्तीचाच ‘पुकारा’ करण्याची वेळ त्याच्या कुटुंबियावर आली.
मालेगाव मध्य : प्रत्येकाचा मृत्यू हा विधीलिखित असतो. शहरात दुचाकीवर फिरून गल्लोगल्ली ‘पुकारा’ करीत मृत्यूची खबर देणाºया ‘पुकारे’लाच मृत्यूने गाठले आणि मृत्यूचा ‘पुकारा’ करणाºया व्यक्तीचाच ‘पुकारा’ करण्याची वेळ त्याच्या कुटुंबियावर आली.
नयापुरा भागातील ही घटना.. काल बुधवारी हजारोंच्या निधनाचा ‘पुकारा’ करणाºया जमीलभार्इंचा पुकारा करताना दुचाकीवरच हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले. त्यामुळे पुकारा करणाºयांवर आपल्याच सहकाºयाच्या मृत्यूचा पुकाºयाची वेळ आली.
जमील अहमद समसुद्दोहा उर्फ जमीलभाई पुकारेवाले (५५) रा. मिनारा मशिद नयापुरा यांचे बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास पुकारा करण्यासाठी (ध्वनीक्षेपकासह) वापरावयाच्या वाहनावर उभे राहून मित्रांशी बोलत असतानाच हृदयविकाराचा झटका येऊन निधन झाले. मयतीच्या पुकाºयासाठी प्रसिद्ध असल्याने सहकाºयांकडून त्यांचा पुकारा होत असल्याचे ऐकताच शहरात हळहळ व्यक्त करण्यात आली.
मालेगाव शहरात एकूण पाच कब्रस्तान आहेत. मुस्लिम धर्माच्या रितीनुसार मृत व्यक्तीच्या निधनाचा पुकारा (माहिती) करणे अनिवार्य आहे. त्यामुळे शहराचा वाढता विस्तार पाहता पुकारा करणाºया करवी पुकारा करण्यात येतो. शहरात असे एकूण १५ पुकारे करणारे इसम आहेत. त्यापैकी जमीलभाई एक होते.
१२ फेब्रुवारी २००० रोजी शहराचेच नव्हे तर संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेले मौलाना मोहंमद हनीफ मिल्ली यांचे निधन झाले होते. त्यांच्या दफनविधीस उपस्थित जनसमुदायाची नोंद आजही कायम आहे.
अठरा वर्षात अनेकांचा केला पुकारा
जमीलभार्इंनी सर्वप्रथम मौलाना हनीफ मिल्ली यांचा पुकारा केला होता. तेव्हापासून त्यांनी यास आपला व्यवसाय करुन घेत त्यातून मिळणाºया उत्पन्नावर आपला उदरनिर्वाह करीत होते. गेल्या अठरा वर्षात त्यांनी हजारोंच्या संख्येने निधनाचे पुकारे केलेले आहेत. आज त्यांच्याच नावाचा पुकारा करावा लागला. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, तीन मुले असा परिवार आहे.