खासगी माध्यमिक शाळांमध्ये रचनावादाचे मरण : रमेश पानसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 01:11 AM2019-12-15T01:11:35+5:302019-12-15T01:11:52+5:30

राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, आनंद आणि निर्णयक्षमता निर्माण करणारे रचनावादी शिक्षण दिले जात असले तरी माध्यमिक शिक्षण देणाऱ्या बहुतांश शाळा खासगी संस्थांच्या असून, येथे रचनावाद मारला जात असल्याची खंत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांनी केले आहे.

The death of constructivism in private middle schools: Ramesh Panse | खासगी माध्यमिक शाळांमध्ये रचनावादाचे मरण : रमेश पानसे

खासगी माध्यमिक शाळांमध्ये रचनावादाचे मरण : रमेश पानसे

googlenewsNext
ठळक मुद्देनाईक पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमात केली टीका

क्रांतिवीर वसंतराव नाईक पुण्यतिथीनिमित्त बोलताना रमेश पानसे. व्यासपीठावर पंढरीनाथ थोरे, अ‍ॅड. अशोक आव्हाड, पंडितराव येलमामे, कमलेश बोडके, तानाजी जायभावे, सुरेश घुगे. अ‍ॅड. पी. आर. गिते, नरेंद्र दराडे, दिगंबर गिते आदी.
नाशिक : राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, आनंद आणि निर्णयक्षमता निर्माण करणारे रचनावादी शिक्षण दिले जात असले तरी माध्यमिक शिक्षण देणाऱ्या बहुतांश शाळा खासगी संस्थांच्या असून, येथे रचनावाद मारला जात असल्याची खंत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांनी केले आहे. शालेय शिक्षण समाधानकारक करण्यासाठी रचनावाद शिक्षण पद्धती एकमेव उपाय असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेतर्फे क्रांतिवीर वसंतराव नाईक यांच्या ५१व्या पुण्यतिथीनिमित्त ते बोलत होते. नाईक संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पुण्यतिथी कार्यक्रमात व्यासपीठावर आमदार नरेंद्र दराडे, नगरसेवक कमलेश बोडके, पुष्पा आव्हाड, पंडित येलमामे, पां. भा. करंजकर, संस्थेचे उपाध्यक्ष पी. आर. गिते, योगाचार्य प्रज्ञा पाटील आदी उपस्थित होते. पानसे म्हणाले, जगातील सर्वात तरुण असलेल्या भारतात तरुणांना योग्य शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याची आपली जबाबदारी असल्याचे अधोरेखित करताना मुलांना इंग्रजीऐवजी मराठी माध्यमातूनच शिक्षण देण्याचे आवाहन त्यांनी केले. केंद्र सरकारने २०१४ पासून रचनावादी शिक्षणासाठी पुढाकार घेतला असून, त्यानुसार आराखडाही तयार करण्यात आला आहे. परंतु, २००९ मध्ये आलेल्या शिक्षण हक्क कायद्यातही रचनावादी शिक्षण पद्धती अस्तिवात आणण्याचा प्रयत्न केला गेला असतानाही प्रत्यक्षात मात्र दहा वर्ष होऊनही ही पद्धती वर्गात अंमलात आणली जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, विद्यार्थीदशेतील विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग याविषयी विविध प्रसंगांच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांनी क्रांतिवीर वसंतराव नाईक यांच्या कार्याला उजाळा दिला.

Web Title: The death of constructivism in private middle schools: Ramesh Panse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.