हरणगाव धरणात बुडून मुलीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 12:51 AM2019-06-11T00:51:02+5:302019-06-11T00:52:32+5:30

पेठ : सुटीच्या काळात आसरबारी येथे मामाच्या गावी आलेल्या नातेवाइकांसमवेत हरणगावनजीक असलेल्या धरणात कपडे धुण्यासाठी गेलेल्या पाच मुली अंघोळीसाठी पाण्यात उतरल्याने बुडल्या. पैकी एकीचा दुर्दैवी मृत्यू झाला. जवळच असलेल्या तीन लहान मुलांनी जिवाची बाजी लावत चार मुलींना वाचवले.

Death of daughter drown in Harangaon dam | हरणगाव धरणात बुडून मुलीचा मृत्यू

ज्योती तुकाराम जाधव

Next
ठळक मुद्देदुर्घटना : पाचपैकी चार मुलींना वाचविण्यात यश

पेठ : सुटीच्या काळात आसरबारी येथे मामाच्या गावी आलेल्या नातेवाइकांसमवेत हरणगावनजीक असलेल्या धरणात कपडे धुण्यासाठी गेलेल्या पाच मुली अंघोळीसाठी पाण्यात उतरल्याने बुडल्या. पैकी एकीचा दुर्दैवी मृत्यू झाला. जवळच असलेल्या तीन लहान मुलांनी जिवाची बाजी लावत चार मुलींना वाचवले.
आसरबारी येथील जयश्री कमलाकर भुसारे, साक्षी कमलाकर भुसारे (१४) ज्योती तुकाराम जाधव (१२), अर्चना तुकाराम जाधव (१६) व दीक्षा तुकाराम जाधव (११) या पाच मुली हरणगाव येथील धरणात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुऊन वाळत टाकल्यानंतर पोहण्याची इच्छा झाल्याने पाचही मुलींनी धरणात उड्या घेतल्या. मात्र खोलीचा अंदाज न आल्याने साक्षी भुसारे व ज्योती जाधव बुडू लागल्या. मुलींचा ओरडाओरडा ऐकून परिसरातच असलेल्या तीन मुलांनी घटनास्थळी धाव घेत जिवाची पर्वा न करता या मुलींना पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. साक्षीला वाचविण्यात या छोट्या मुलांना यश आले. मात्र ज्योती तुकाराम जाधव पाण्याखाली गेल्याने वाचवणे कठीण झाले. सदरची घटना कळताच हरणगाव, आसरबारीसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले. सायंकाळपर्यंत प्रयत्न करून रात्री ८ च्या सुमारास ज्योतीचा मृतदेह हाती लागला. याबाबत पोलीसपाटील गेणुदास जाधव यांनी पेठ पोलिसांना खबर दिली.
पोलीस पथकाने पट्टीच्या पोहणाऱ्या युवकांना पाचारण केले. मयत ज्योती जाधव या मुलीचे वडील तुकाराम जाधव हे कल्याण येथे पोलीस दलात कार्यरत आहेत. याबाबत पेठ पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली असून, पोलीस तपास करीत आहेत.तिघांनी केले शर्थीचे प्रयत्नधरणात मुली बुडत असल्याचे लक्षात येताच परिसरात असलेले देवानंद मुरलीधर गायकवाड, हर्षद रघुनाथ जाधव व पंडित रोहिदास गायकवाड या १०-१२ वर्षीय मुलांनी धरणाकडे धाव घेऊन जिवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेतली. एका मुलीला वाचवत पाण्याबाहेर काढण्यात त्यांना यश आले; मात्र ज्योती जाधव हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही लहान मुले वेळेत हजर झाली नसती तर मोठे संकट ओढवणार होते. सदर घटनने आसरबारी गावावर शोककळा पसरली. साक्षी व जयश्री या दोन्ही दिंडोरी तालुक्यातील सादराळे गावच्या असून, सुटीनिमित्त आसरबारी येथे मामाच्या गावी आल्या होत्या.

Web Title: Death of daughter drown in Harangaon dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात