विहिरीत पडलेल्या हरिणाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 09:22 PM2020-05-11T21:22:20+5:302020-05-11T23:34:51+5:30

येवला : तालुक्यातील विखरणी परिसरात पिण्याच्या पाण्याच्या शोधार्थ विहिरीत पडलेल्या हरिणाला तरुणांनी जीवदान दिले आहे. पाटोदा, विखरणी व कानडी परिसरात हरिणांचे कळप आहेत. विखरणी - कानडी रस्त्यावर पिण्याच्या पाण्याच्या शोधात निघालेल्या हरिणांच्या कळपामागे भटके कुत्रे लागले.

 Death to a deer that fell into a well | विहिरीत पडलेल्या हरिणाला जीवदान

विहिरीत पडलेल्या हरिणाला जीवदान

googlenewsNext

येवला : तालुक्यातील विखरणी परिसरात पिण्याच्या पाण्याच्या शोधार्थ विहिरीत पडलेल्या हरिणाला तरुणांनी जीवदान दिले आहे.
पाटोदा, विखरणी व कानडी परिसरात हरिणांचे कळप आहेत. विखरणी - कानडी रस्त्यावर पिण्याच्या पाण्याच्या शोधात निघालेल्या हरिणांच्या कळपामागे भटके कुत्रे लागले. कुत्र्यांच्या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी धावताना या कळपातील एक हरीण विहिरीत पडले. कुत्र्यांच्या भुंकण्याच्या आवाजाने आजूबाजूला असलेल्या शेतकऱ्यांनी सदर घटना पाहिली.
योगेश उशीर या तरुणाने तात्काळ सत्तर फूट खोल असणाºया विहिरीत उतरून हरिणाला दोराच्या साहाय्याने बांधून गोरख शेलार, सोमनाथ उशीर, ज्ञानेश्वर काळे, गोरख आहेर, भागवत जिरे, दिनकर काळे, रवि उशीर, दादा शेलार या सहकाऱ्यांच्या मदतीने विहिरीतून बाहेर काढले. अकस्मात विहिरीत पडल्याने सदर हरीण जखमी झाले होते. सदर घटनेची माहिती वनविभागाला देऊन हरिणाला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले.

Web Title:  Death to a deer that fell into a well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक