पाण्याच्या शोधार्थ मोराचा वीजेच्या धक्याने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 04:34 PM2018-04-03T16:34:08+5:302018-04-03T16:34:08+5:30
वटार -परिसरात पाण्याच्या शोधार्थ आलेल्या २० ते २५ मोरांच्या थव्यावर अचानक कुत्र्यांनी हल्ला चढविल्याने जीव वाचविण्याच्या नादात एका मोराचा वीजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली.सदर घटनेची माहिती वनविभागाला कळवली असता एम.बी.शेख यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन घटनास्थळाची पाहणी केली व पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पशुवैद्कीय दवाखान्यात पाठवण्यात आले. यावेळी घटनास्थळी जिभाऊ खैरनार, उपसरपंच जितेंद्र शिंदे, एम.बी.शेख, संतोष खैरनार, किसन शिंदे, हरिष खैरनार, प्रदीप खैरनार, मनोहर खैरनार, हेमंत खैरनार, बापू बागुल, जितेंद्र गागुर्डे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते. वायरमन सचिन ठोके यांनी लगेच वीजपुरवठा बंद करत घटनास्थळी धाव घेतली. रोहित्रबंद करून पाहणी केली व नंतर वीजपुरवठा सुरळीत केला. ‘सततची जंगलतोड व पाण्याचा होत असलेला ºहास त्यामुळे वन्यजीवन धोक्यात आले आहे. जंगलात प्राण्यांसाठी पाण्याची कोणतीही सुविधा नाही. उदास होणारी जंगलतोड, तसेच गेल्या दोन महिन्यात बागलाणच्या पश्चिम पट्यातील तीन डोंगराना लागलेल्या आगीण मुळे वन्यप्राणी आपला जीव वाचवण्यासाठी मानवीवस्तीकडे पलायन करायला लागले आहेत. जर जंगल सुरक्षित राहील असत तर ह्या निरागस मोराला आपला जीव गमवावा लागला नसता.