डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याने निधन

By admin | Published: December 5, 2014 01:48 AM2014-12-05T01:48:24+5:302014-12-05T01:49:25+5:30

डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याने निधन

Death due to infection with dengue fever | डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याने निधन

डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याने निधन

Next

सिडको : थंडी, ताप आल्याने रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेस डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याने उपचारादरम्यान आज या महिलेचे निधन झाले.खुटवडनगर आय.टी.आय. पुलाजवळील कांबळेवाडीतील रंजना सुधाकर आव्हाट (४०) असे निधन झालेल्या महिलेचे नाव आहे. थंडी, तापामुळे तब्येत बिघडलेल्या रंजना आव्हाट या महिलेस दि. २८ नोव्हेंबर रोजी त्रिमूर्ती चौक येथील सायखेडकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रंजना आव्हाट यांच्या प्लेटलेट कमी झाल्या होत्या. त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. श्रेयांस शहा यांनी शर्तीचे प्रयत्न केले; परंतु यानंतरही प्लेटलेट अत्यंत कमी झाल्याने श्वास घेण्यास जमत नसल्याने रात्रीपासून त्यांना व्हेंटिलेटर्सवर (कृत्रिम श्वास) ठेवण्यात आले होते.
आज सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास त्यांचे निधन झाल्याचे डॉ. शहा यांनी सांगितले. याबाबतचा अहवाल मनपाच्या वैद्यकीय विभागास कळविण्यात आल्याचे रुग्णालयाचे समन्वयक डॉ. प्रशांत आंबरे यांनी सांगितले.
नाशिक शहरासह सिडको भागात डेंग्यूसदृश आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असून, मनपाच्या आरोग्य विभागाने केवळ एक दिवसाची वरवरची मोहीम राबवून शांत न राहता स्वच्छता मोहीम सातत्याने राबविणे गरजेचे आहे. नुसते कागदी घोडे न नाचवता नागरिकांच्या घरोघरी जाऊन स्वच्छतेबाबत जनजागरण करणे गरजेचे असल्याची भावना जनसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)

Web Title: Death due to infection with dengue fever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.