चाकीस्वाराचा ताबा सुटल्याने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 06:46 PM2020-09-13T18:46:07+5:302020-09-13T18:48:35+5:30
नाशिक : सारडा सर्कलवरून भरधाव दुचाकी चालवित द्वारकेच्या दिशेने मार्गस्थ होताना रस्त्यात भटके श्वान पळाल्याने दुचाकीस्वाराचा ताबा सुटल्याने वाहन ...
नाशिक : सारडा सर्कलवरून भरधाव दुचाकी चालवित द्वारकेच्या दिशेने मार्गस्थ होताना रस्त्यात भटके श्वान पळाल्याने दुचाकीस्वाराचा ताबा सुटल्याने वाहन घसरु न अपघात झाल्याने चालकाचा मृत्यू झाला. श्याम चंद्रकांत इंगळे(२९, रा. केळेगाव, ता.सिल्लोड) याचा मृत्यू झाला. इंगळे हे त्यांच्या बजाज डिस्कव्हर दुचाकीने (एम एच १५ एच ए ८६३१) भरधाव जात होते. संध्याकाळी ५.३० वाजेच्या सुमारास सारडा सर्कल येथे एक कुत्रा त्यांच्या वाटेत पुढे आल्याने त्यांचा दुचाकीचा ताबा सुटला आणि दुचाकी घसरली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
विनयनगरला बंगला फोडून ७७ हजाराचा ऐवज लंपास
नाशिक : मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत विनयनगर येथे एका बंद बंगल्याचे कुलुप तोडून अज्ञात चोरट्यानी सुमारे ७७ हजाराचा ऐवज लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी चोरट्याविरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी हेमंत शंकरराव जोशी (४८) यांच्या सासऱ्यांचा बंद बंगला अज्ञात चोरट्यांनी १० ते १२ तारखेच्या दरम्यान फोडला. चोरट्यांनी घरातून ३० हजाराचा सोन्याचा नेकलेस, १५ हजाराचे सोन्याचे मोहनमाळ, ७ हजाराचे कानातले सोन्याचे टॉप्स, ५ हजाराचा एलजीचा फ्रीज, ३ हजारांचा जुना टीव्ही, मिक्सर, टेबल फॅन, पंचपात्री, जर्मनचे सहा डब्बे, २ सिलिंडरच्या टाक्या, १० हजरांचा म्युझीक पियानो असा एकूण ७७ हजार ५०९ रु पयांचा ऐवज चोरट्याने लुटून पोबारा केल्याचे जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
चोरट्यानी मुख्य प्रवेशद्वारावर असलेले लोखंडी ग्रील कापून बंगल्याच्या आत प्रवेश करत बेडरूममध्ये कपाटात ठेवलेलं दागिने स्वयंपाक घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू लंपास केल्या आहेत याप्रकरणी पोलिसांनी जबरी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक चेतन श्रीवंत हे करीत आहेत.
शहरातवेगवेगळ्या भागात तिघांची आत्महत्या
नाशिक : पेठरोड येथील जुईनगर परिसरातील रिहवासी दीपक शंकर पाथरे (२७) याने विष प्राशन केल्याने त्याचा मृत्यू झाला. शनिवारी (दि.१२) हा प्रकार उघडकीस आला. दीपकने राहत्या घरात विष सेवन केले, त्यास जिल्हा रु ग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी म्हसरु ळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दुसर्या घटनेत दत्तमंदिर येथील रिहवासी अभिषेक सोमनाथ वाडेकर (२८) या युवकाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. शनिवारी (दि.१२) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. अभिषेकने गळफास घेतल्याचे आढळून आल्याने त्यास हर्षद वाडेकर याने जिल्हा रु ग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तीसºया घटनेत गंगापुर पोलीस ठाणे हद्दीत घडली
येथील एका मंदिराजवळ एका वृद्धाने उडी घेत आपले जीवन संपविले. गोदापात्रात देविदास शंकर बागुल (७५, रा. रामेश्वर नगर) यांनी उडी मारु न आत्महत्या केली. बागुल यांनी जलसमाधी घेत असल्याची चिठ्ठी लिहून घराबाहेर पडले होते, असे पोलिसांनी सांगितले. शनिवारी (दि.११) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.