थंडीमुळे हृदय विकाराच्या झटक्याने शेतकऱ्याचा मृत्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 07:27 PM2018-12-20T19:27:49+5:302018-12-20T19:28:36+5:30
पिळकोस : कळवण तालुक्यातील जुनी बेज येथील एका शेतकºयाचा गुरुवारी रात्री कांद्याला पाणी देण्यासाठी गेले असता अति थंडीमुळे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यु झाला. जुनी बेज सह परिसरातील हि पाहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.
पिळकोस : कळवण तालुक्यातील जुनी बेज येथील एका शेतकºयाचा गुरुवारी रात्री कांद्याला पाणी देण्यासाठी गेले असता अति थंडीमुळे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यु झाला. जुनी बेज सह परिसरातील हि पाहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.
जुनी बेज येथील अल्प भूधारक शेतकरी मनोहर बाबुराव शेवाळे (५४) हे गुरुवारी (दि.२०) मध्यरात्री ३ वाजता आपल्या गावातील घरातून कांदा पिकाला पाणी देण्यासाठी गोंधळ आंबा शिवारातील शेतात गेले मात्र सकाळी सात वाजेपर्यंत ते घरी आले नसल्याने त्याच्या पत्नी शकुंतला शेवाळे यांनी त्यांना फोन लावला असता ते फोन उचलत नसल्याने त्यांनी शेताकडे धाव घेतली.
त्यांनी शेतात जाऊन पाहिले असता मनोहर शेवाळे हे कांद्याच्या शेतात पाण्याच्या सारंगीत मृत अवस्थेत आढळून आले. त्यावेळी त्यांनी आरडाओरड केली बाजूचे शेतकरी व तरुण धावून आले. त्यानंतर त्यांना कळवण येथील उपजिल्हा रु ग्णालयात नेले असता ते मृत झाले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
यावेळी कळवण पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदन करून मनोहर शेवाळे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक एस. जी. मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जगन पवार, कोशारे करीत आहे.
चौकट : पिकांना पाणी देण्यासाठी जाणाºया शेवाळे यांना कडाक्याची थंडी सहन न झाल्यामुळे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. महावितरणने शेतीसाठी रात्री वीजपुरवठा देण्याएवजी कृषिपंपासाठी दिवसा वीजपुरवठा करावा अशी मागणी परिसरातून होत असूनही महावितरण व लोकप्रतिनिधी हि त्याकडे लक्ष देत नसल्याने शेतकरी व ग्रामस्थांनी लोकमतशी बोलताना नाराजी व्यक्त केली.
(फोटो 20 ेंल्लङ्मँं१ २ँी५ं’ी)