विहिरीत उतरलेल्या शेतकºयाच्या मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 12:03 AM2017-12-29T00:03:48+5:302017-12-29T00:05:36+5:30
सिन्नर : तालुक्यातील पुतळेवाडी (रामपूर) येथे विद्युत जलपंप दुरुस्तीसाठी विहिरीत उतरलेल्या शेतकºयाच्या डोक्यात दगड पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.
सिन्नर : तालुक्यातील पुतळेवाडी (रामपूर) येथे विद्युत जलपंप दुरुस्तीसाठी विहिरीत उतरलेल्या शेतकºयाच्या डोक्यात दगड पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.
सोमनाथ भानुदास वाघचौरे (२८) हा युवा शेतकरी जलपरीला अडकलेले गवत काढण्यासाठी दगडी बांधकाम असलेल्या विहिरीत उतरला होता. यावेळी विहिरीत दगड पडला. तो नेमका सोमनाथ यांच्या डोक्यावर कोसळला. उंचावरु न दगड डोक्यात पडल्याने ते गंभीर जखमी झाले. शेजारील शेतात असलेल्या चुलत भावाने सोमनाथ विहिरीतून येत नसल्याने विहिरीत डोकावून पाहिल्यानंतर प्रकार लक्षात आला. त्याने तत्काळ मदतीसाठी इतरांना बोलावले. जखमी सोमनाथ यास शहा येथील रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले. दोडी ग्रामीण रु ग्णात शवविच्छेदन करण्यात आले. वावी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत सोमनाथ यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, बहीण असा परिवार आहे.