सिटू संघटनेच्या वतीने आमरण उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 10:17 PM2020-10-05T22:17:48+5:302020-10-06T01:08:43+5:30

मनमाड: मनमाड नगर परिषदेतील मयत कर्मचारी यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरीवर सामावून घ्यावे यासह इतर प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने पालिका प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले.

Death fast on behalf of Situ organization | सिटू संघटनेच्या वतीने आमरण उपोषण

मनमाड येथे महाराष्ट्र नगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलन प्रसंगी मार्गदर्शन करताना रामदास पगारे.

Next
ठळक मुद्देमनमाड :मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांसह सदस्यांचा सहभाग

मनमाड : मनमाड नगर परिषदेतील मयत कर्मचारी यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरीवर सामावून घ्यावे यासह इतर प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने पालिका प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले.
गेल्या ६ ते ७ वर्षा पासून वारसहक्क अनुकंपावर मयत कामगारांच्या वारसदारना सामावून घ्यावे तसेच अन्य हक्काच्या मागण्याकरीता करण्यात आलेल्या या आंदोलनात मयत कर्मचाऱ्यांचे वारस तसेच संघटनेचे प्रमुख पदाधिकारी , अश्वासित प्रगती योजना पदोन्नतीच्या लाभापासून वंचित ठेवलेल्या २५ ते ३० पुरुष व महिला कामगार प्रतिनिधी सहभागी झाले होते.
प्रभारी नगराध्यक्ष राजाभाउ अहिरे, मुख्याधिकारी पंकज गोसावी,नगरसेवक गंगाभाउ त्रिभुवन यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेउन चर्चा केली. पालिका प्रशासनाकडून सकारात्मक अश्वासन मिळाल्याने उपोषण तुर्त स्थगीत करण्यात आले. यावेळी सिटू संघटनेचे
किशोर अहिरे, जॉनी जॉर्ज , रामदास पगारे, सुभाष केदारे, हाजी असलम शेख, अरूण दरगुडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Death fast on behalf of Situ organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.