झोडगेत अतिक्रमण काढण्यासाठी आमरण उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 10:53 PM2021-09-28T22:53:19+5:302021-09-28T22:53:19+5:30
झोडगे : येथील वसंत वामन नेरकर हे त्यांच्या जागेवरील अतिक्रमण हटवून मिळावे, यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून लढा देत आहेत. मुख्यमंत्र्यांपासून अधिकारी व पदाधिकाऱ्यांना निवेदने देऊनही न्याय मिळत नसल्याने त्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.

ग्रामपालिकेसमोर मंडप टाकून नेरकर यांनी उपोषणास सुरुवात केली. अतिक्रमण हटवून मिळावे, ठराव करूनही कार्यवाही करण्यास असक्षम असलेल्या ग्रामसेवकावर कायदेशीर कारवाई करावी. सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य हे ठराव करूनही कार्यवाही करण्यास सक्षम नाहीत म्हणून पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना बरखास्त करावे, झोडगे ग्रामपालिका फी भरण्यास तयार असतानादेखील चार महिन्यानंतरही पोलीस प्रशासन बंदोबस्त देऊ शकत नाही.
यात दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर व कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच या कालावधीत जे माझे मानसिक, आर्थिक शोषण झाले त्याची भरपाई ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांकडून वसूल करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे.