स्वत:च्या लग्नाच्या पत्रिका वाटायला गेलेल्या वराचा अपघातात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 01:25 PM2017-12-19T13:25:42+5:302017-12-19T13:26:04+5:30
सटाणा : स्वत:च्या लग्नसमारंभाच्या निमंत्रण पत्रिका वाटण्यासाठी गेलेल्या येथील तरूणाचा नाशिक येथे दुचाकी आदळून जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना सोमवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास घडली.
सटाणा : स्वत:च्या लग्नसमारंभाच्या निमंत्रण पत्रिका वाटण्यासाठी गेलेल्या येथील तरूणाचा नाशिक येथे दुचाकी आदळून जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना सोमवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास घडली. या दुर्दैवी घटनेने सटाणा शहरावर शोककळा पसरली आहे. निलेश बाळासाहेब धिवरे असे या दुर्दैवी
तरूणाचे नाव आहे. सटाणा तहसीलमध्ये तलाठी असलेल्या बी डी धिवरे यांचे चिरंजीव निलेश बाळासाहेब धिवरे यांचा विवाह सटाणा तहसीलमधीलच अव्वल कारकून रवींद्र मगर यांच्या कन्येशी २५ डिसेंबर रोजी मराठा हायस्कूल सटाणा येथे होणार होता. विवाहसोहळ्याची संपूर्ण जय्यत तयारी झालेली असतांना नाशिक येथील जवळच्या मित्रपरिवाराला व नातेवाईकांना विवाहाचे निमंत्रण देण्यासाठी निलेश काल नाशिक येथे गेला होता.रात्री उशिरा पत्रिका वाटून निलेश मामांकडे मुक्कामाला जात असतांना सिडको परिसरातील अतुल डेअरी परिसरात त्याची दुचाकी दुभाजकाला धडकल्याने त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. उपचार मिळण्यापूर्वीच निलेशचा मृत्यू झाला. सटाणा शहरातील भाक्षी रोडलगतच्या शिवाजी नगर येथे राहणाºया धिवरे कुटुंबीयांवर या घटनेमुळे दु:खाचा डोंगर कोसळला असून विवाहाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली असतानाच अशी दुर्दैवी घटना घडल्याने शिवाजी नगरसह भाक्षी रोड शोकसागरात बुडाला आहे.