पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल‘त्या’ विवाहितेचा मृत्यू

By Admin | Published: June 19, 2015 12:11 AM2015-06-19T00:11:14+5:302015-06-19T00:12:17+5:30

पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल‘त्या’ विवाहितेचा मृत्यू

Death to husband's murder 'Marriage death' | पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल‘त्या’ विवाहितेचा मृत्यू

पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल‘त्या’ विवाहितेचा मृत्यू

googlenewsNext

नाशिक : पतीच्या अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने रॉकेल ओतून पेटवून देण्यात आलेल्या हिरावाडीतील विवाहितेचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अरुणा जितेंद्र जाधव (रा. बनारसी नगर, हिरावाडी) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव असून, याप्रकरणी पती जितेंद्र पंढरीनाथ जाधव, भावजय सरला जाधव यांच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या रविवारी (दि.१४) घडलेल्या घटनेनुसार रात्री १० वाजेच्या सुमारास अरुणा जाधव यांनी फोन उचलला नाही या कारणावरून कुरापत काढून पती जितेंद्र जाधव यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून अंगावर रॉकेल ओतले, तर जाऊ सरला ज्ञानेश्वर जाधव हिने काडी लावून पेटविण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद पंचवटी पोलीस ठाण्यात दिली होती. या घटनेत अरुणा जाधव गंभीरपणे भाजल्या गेल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर अरुणा जाधव यांचा जबाब नोंदविण्यात आला होता. त्यांनी सुरुवातीला दिलेल्या जबाबात बदल करीत पती व त्यांच्या भावजयमध्ये असलेल्या अनैतिक संबंधातून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितल्याने पती व
जाऊबाई यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पंचवटी पोलिसांनी दिली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Death to husband's murder 'Marriage death'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.