विजेच्या धक्क्याने जखमी विद्यार्थ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 00:02 IST2018-11-07T00:01:45+5:302018-11-07T00:02:12+5:30
नायगाव : विजेच्या धक्क्याने जखमी झालेल्या सिन्नर तालुक्यातील ब्राह्मणवाडे येथील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

विजेच्या धक्क्याने जखमी विद्यार्थ्याचा मृत्यू
नायगाव : विजेच्या धक्क्याने जखमी झालेल्या सिन्नर तालुक्यातील ब्राह्मणवाडे येथील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.
सोमठाणे येथे रविवारी (दि.४ ) वस्तीवर घर बांधकामासाठी गेलेल्या वडीलांबरोबर मुलगा किरणही वस्तीवर गेला. वस्तीवर असलेल्या बदामाच्या झाडावरून गेलेल्या विद्युत तारांचा अंदाज न आल्याने वीजेच्या जबरदस्त झटक्याने किरण गंभीर जखमी झाला. घटना घडताच किरण यास नाशिक येथील शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी दुपारी उपचार सुरू असताना या विद्यार्थ्याचा मुत्यू झाला. ब्राम्हणवाडे येथील व्ही.एन.नाईक विद्यालयात इयत्ता सातवीत शिकणारा किरण नवनाथ जाधव ( १२ ) हा पंधरा दिवसापुर्वीच आपल्या मामाच्या गावी गेलेल्या वडिलांकडे गेला होता. ऐन दिवाळीतच अशी घटना घडल्याने ब्राम्हणवाडे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मंगळवारी सायंकाळी ब्राम्हणवाडे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. (फोटो ०६ नायगाव)