मुसळगावच्या विवाहितेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2020 12:01 AM2020-09-01T00:01:11+5:302020-09-01T01:07:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाडीवºहे : सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील विवाहिता माधुरी विकास शिरसाट (२५) हिचा शारीरिक,मानसिक छळ करून तिला मारून विहिरीत फेकल्यामुळे तिचा मृत्यू झाला असून, याबाबत दोषींंवर कडक कारवाई करावी, अशी तक्र ार विवाहितेचे वडील पंढरीनाथ केरू भोर (रा. जानोरी, ता. इगतपुरी) यांनी पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्याकडे दाखल केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाडीवºहे : सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील विवाहिता माधुरी विकास शिरसाट (२५) हिचा शारीरिक,मानसिक छळ करून तिला मारून विहिरीत फेकल्यामुळे तिचा मृत्यू झाला असून, याबाबत दोषींंवर कडक कारवाई करावी, अशी तक्र ार विवाहितेचे वडील पंढरीनाथ केरू भोर (रा. जानोरी, ता. इगतपुरी) यांनी पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्याकडे दाखल केली आहे.
आपल्या मुलीच्या मृत्यूस कारणीभूत सासरे नामदेव गंगाधर शिरसाट, पती विकास नामदेव शिरसाट, सासू गयाबाई नामदेव शिरसाट व दीर किरण यांस कडक शासन व्हावे, अशी मागणी पंढरीनाथ भोर यांनी तक्रारीत केली आहे. भोर यांची मुलगी माधुरी हिचा विवाह १२ मार्च २०१८ रोजी मुसळगाव येथील विकास शिरसाट यांच्या सोबत झाला होता. तेव्हापासून सासरचे लोक माधुरीला वडिलांकडून पाइपलाइन व ट्रॅक्टर खरेदीसाठी मोठ्या रकमेची मागणी करत होते. अडचण असूनदेखील भोर यांनी मुलीसाठी सुरुवातीला ४० हजार रुपये रोख दिले. त्यानंतर माधुरीला मुलगा झाला. तरीही माधुरीला त्रास व छळ आणि पैशांचा तगादा सुरूच होता. याबाबत ती वारंवार आईवडिलांकडे कैफियत मांडत होती. मात्र, शुक्र वारी (दि. २८) सायंकाळी पंढरी भोर यांना फोन करून मुलगी माधुरी जानोरीला आली का, ती गायब आहे अशी विचारणा सासरे नामदेव शिरसाठ यांनी केली. माधुरी विहिरीत मृतावस्थेत आढळून आल्याने भोर यांनी सासरच्यांनी तिचा घातपात केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे.सात दिवसांपूर्वी माधुरीला वडील पंढरी भोर यांनी सोन्याचे दागिने नेऊन दिले होते. परंतु विहिरीतून माधुरीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला तेव्हा तिच्या अंगावर सर्वच नकली दागिने होते. यामुळे खरे सोन्याचे दागिने कुठे गायब झाले आहेत, असा सवालही भोर यांनी उपस्थित केला आहे.तक्र ारीची सखोल चौकशी केली जाईल. कायदा कुणालाही सोडत नाही. परिस्थितीबाबत माहिती घेऊन कारवाई करू. तक्रारदाराला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत.
- डॉ. आरती सिंह,
पोलीस अधीक्षक