पाथर्डी फाटा परिसरातील वृद्धाचा स्वाइन फ्लूने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 01:49 IST2018-10-06T01:47:56+5:302018-10-06T01:49:12+5:30
जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात उपचार सुरू असलेल्या पाथर्डी फाटा परिसरातील वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ देवीदास दुसाने (६१, रा. वासननगर) असे स्वाइन फ्लूने मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव आहे.

पाथर्डी फाटा परिसरातील वृद्धाचा स्वाइन फ्लूने मृत्यू
नाशिक : जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात उपचार सुरू असलेल्या पाथर्डी फाटा परिसरातील वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ देवीदास दुसाने (६१, रा. वासननगर) असे स्वाइन फ्लूने मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव आहे.
खासगी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या दुसाने यांना स्वाइन फ्लू असल्याचे तपासणीत समोर आले होते़ गुरुवारी (दि़ ४) रात्री त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात दाखल केले होते़ त्यांच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला़ जिल्हा रुग्णालयाने दुसाने यांचा स्वॅब तपासणीसाठी पाठविला असून, त्यांचा तपासणी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही़
दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात सद्यस्थितीत नऊ रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यापैकी चौघांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे, तर उर्वरित पाच जणांचे अहवाल अद्याप आलेले नाहीत़