लष्करी जवानाच्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी लागून एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 01:06 AM2017-08-28T01:06:16+5:302017-08-28T01:06:39+5:30

तालुक्यातील ढेकू येथे एका लष्करी जवानाच्या घरात रिव्हॉल्व्हरची गोळी लागून जवानाचा मामेभाऊ बाजीराव म्हस्के (४०) ठार झाल्याची घटना रविवारी घडली. प्राथमिक माहितीनुसार सदर घटना घडली तेव्हा त्याठिकाणी मयत इसम, त्याची पत्नी, सैनिकाचा मुलगा व पत्नी असे चौघेजण होते. मालेगाव पोलिसात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली असली तरी नांदगाव पोलिसात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. जवान काकासाहेब साधबळे जम्मूमध्ये लष्कराच्या सेवेत कार्यरत आहेत.

The death of one after the shooting of a military man's revolver | लष्करी जवानाच्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी लागून एकाचा मृत्यू

लष्करी जवानाच्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी लागून एकाचा मृत्यू

googlenewsNext

नांदगाव : तालुक्यातील ढेकू येथे एका लष्करी जवानाच्या घरात रिव्हॉल्व्हरची गोळी लागून जवानाचा मामेभाऊ बाजीराव म्हस्के (४०) ठार झाल्याची घटना रविवारी घडली. प्राथमिक माहितीनुसार सदर घटना घडली तेव्हा त्याठिकाणी मयत इसम, त्याची पत्नी, सैनिकाचा मुलगा व पत्नी असे चौघेजण होते. मालेगाव पोलिसात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली असली तरी नांदगाव पोलिसात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. जवान काकासाहेब साधबळे जम्मूमध्ये लष्कराच्या सेवेत कार्यरत आहेत. काकासाहेब मूळचे सहानगाव ता. वैजापूर (औरंगाबाद) येथील रहिवासी आहेत. त्यांनी ढेकू येथे शेती विकत घेतल्याने त्यांची पत्नी, मुलगा राहुल व वडील काकासाहेब साधबळे ढेकू येथे स्थलांतरित झाले असून, ते तिथेच राहतात. मयत बाजीराव रा. हिंगणे, ता. कन्नड आपली पत्नी यमुनाबाई हिला घेऊन ऋ षिपंचमीच्या पूजेसाठी आले होते. त्यानंतर ते साधबळेच्या घरी आले. दुपारी दीड वाजेच्या सुमारास, कुतूहलापोटी राहुल, बाजीराव व यमुनाबाई रिव्हॉल्व्हर बघत असताना अचानक ते लोड झाले व खटका दाबला गेला, अशी माहिती आहे. यमुनाबाई की राहुल यापैकी नेमकी कोणाकडून गोळी उडाली हे अद्याप संदिग्ध आहे. पिस्तुलातून निघालेल्या गोळीने बाजीरावचा वेध घेतला. अत्यंत जवळून निघालेली गोळी बाजीराव यांच्या छाती व पोटाच्या मध्यभागाचा वेध घेत, त्यांच्या पाठीतून उजव्या बाजूकडे आरपार निघाली. गोळी लागल्याने अत्यंत गंभीर जखमी झालेल्या बाजीराव यास तातडीने मालेगाव येथील प्रयाग हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, मालेगावच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मयत बाजीराव याचे शव अंत्यविधीसाठी हिंगणे येथे रवाना करण्यात आले आहे. ढेकू येथील घरात न वापरलेले काडतूस सापडले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बशीर शेख, पोलीस उपनिरीक्षक बालाजी पदमने, रमेश पवार आदी पुढील तपास करत आहेत.दरम्यान बाजीराव म्हस्के यांच्या मृत्यूला पुतण्या नवनाथ म्हस्के याने राहुल यास जबाबदार धरले आहे.
मयताची पत्नी यमुनाबाई मानसिक धक्क्यातून सावरलेली नसल्याने पोलिसांच्या तपासात अडथळा निर्माण झाला आहे. तसेच राहुलच्या म्हणण्यानुसार तो झोपलेला होता. आवाजाने जाग आली तेव्हा ही दुर्घटना दिसली. सकृतदर्शनी संशयाची सुई राहुलकडे वळत असली तरी पोलिसांना गुन्हा दाखल करण्यासाठी यमुनाबाईच्या जबाबाची प्रतीक्षा आहे. एकंदरीत या घटनेच्या पाठीमागच्या सर्व शक्यता पडताळून बघण्याचे काम रात्री उशिरापर्यंत पोलीस करत होते.

Web Title: The death of one after the shooting of a military man's revolver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.