उपचार सुरु असलेल्या एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 08:17 PM2020-06-30T20:17:16+5:302020-06-30T22:51:04+5:30
येवला : येवला तालुक्यातील खाजगी लॅबकडील ३ संशयिताचे कोरोना अहवाल मंगळवारी पॉझिटीव्ह आले आहेत. तर नाशिक येथे खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या ८९ वर्षीय बाधित वृध्दाचा मृत्यू झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : येवला तालुक्यातील खाजगी लॅबकडील ३ संशयिताचे कोरोना अहवाल मंगळवारी पॉझिटीव्ह आले आहेत. तर नाशिक येथे खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या ८९ वर्षीय बाधित वृध्दाचा मृत्यू झाला आहे.
शहरातील पटेल कॉलनीतील पती-पत्नी सह तालुक्यातील देशमाने येथील पुरूषाचा खाजगी लॅबकडून कोरोना अहवाल मंगळवारी (दि.३०) पॉझिटीव्ह आला आहे. तर मेनरोडवरील ८९ वर्षीय वृध्दांचा नाशिक येथील खाजगी रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याबरोबरच नगरसूल येथील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमधून ७ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत.
तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रु ग्ण संख्या १३३ झाली असून आत्तापर्यंत ९९ बाधित कोरनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर तालुक्यातील कोरोना बळींची संख्या १० झाली असून सध्या बाधित रु ग्णसंख्या २४ झाली आहे. बाधितांपैकी नगरसूल येथील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरला १३ तर नाशिक येथील रूग्णालयात ११ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड यांनी दिली. दरम्यान, १८ संशयित रु ग्णांचे स्वॅब अहवाल प्रलंबीत असल्याचेही त्यांनी सांगीतले.