जिल्ह्याचा मृत्यूदर २.११ तर विभागाचा २.०२ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:19 AM2021-08-21T04:19:27+5:302021-08-21T04:19:27+5:30
नाशिक : विभागातून शुक्रवारपर्यंत (दि. २०) एकूण ९ लाख २१ हजार ८४७ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून विभागातील रुग्ण बरे ...
नाशिक : विभागातून शुक्रवारपर्यंत (दि. २०) एकूण ९ लाख २१ हजार ८४७ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून विभागातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२३ टक्के तर मृत्यूदर २.०२ टक्क्यांवर तर नाशिक जिल्ह्याचा मृत्यूदर २.११ वर पोहोचला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन यंत्रणा, आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नातून नाशिक विभागात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे. विभागात सद्यस्थितीत ६ हजार ९५८ रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत विभागात १९ हजार १७० रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ यांनी दिली आहे. नाशिक विभागातून आतापर्यंत लॅबमध्ये ५९ लाख ९९ हजार ६८५ अहवाल पाठविण्यात आले असून त्यापैकी ९ लाख ४८ हजार ३२ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत ४ लाख ४ हजार ४०५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३ लाख ९४ हजार ८२६ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १ हजार २२ रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६३ टक्के इतके आहे. आजपर्यंत ८ हजार ५५७ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्याचा मृत्यूदर २.११ टक्के आहे .
इन्फो
धुळे सर्वाधिक दिलासादायक
विभागामध्ये धुळे जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक ९८.४१ टक्के असून तेथील मृत्यूदरदेखील सर्वात कमी १.४५ टक्के आहे. तर जळगाव जिल्ह्यात कोरोनामुक्ततेचे प्रमाण ९८.१७ आणि मृत्यूदर १.८० टक्के आहे. नंदुरबार जिल्ह्यात ९७.६३ टक्के रुग्ण कोरोनामुक्त असून मृत्यूदर मात्र २.३५ टक्के इतका आहे. तर नगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०८ टक्के तर मृत्यूचा दर २.०३ टक्के आहे.