मायलेकाच्या हत्याकांड प्रकरणी मृत्युदंड! न्यायालयाचा निकाल : सातपूर येथे दोन वर्षांपूर्वी घडलेल्या गुन्ह्यात आरोपी रामदास शिंदे यास फाशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 01:38 AM2018-04-27T01:38:40+5:302018-04-27T01:38:40+5:30
नाशिक : बलात्कारास विरोध करणाऱ्या विवाहितेचा तसेच या घटनेचा साक्षीदार असलेल्या सहा वर्षीय चिमुकल्याचा चाकूने सपासप वार करून त्यांची निर्घृण हत्या करणारा सातपूर येथील आरोपी रामदास रंगनाथ शिंदे यास गुरुवारी (दि. २६) जिल्हा न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली.
नाशिक : बलात्कारास विरोध करणाऱ्या विवाहितेचा तसेच या घटनेचा साक्षीदार असलेल्या सहा वर्षीय चिमुकल्याचा चाकूने सपासप वार करून त्यांची निर्घृण हत्या करणारा सातपूर येथील आरोपी रामदास रंगनाथ शिंदे यास गुरुवारी (दि. २६) जिल्हा न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. दोन वर्षांपूर्वी घडलेल्या या थरारक हत्याकांडाने शहर हादरले होते. त्यातील आरोपीस न्यायालयाने बुधवारीच दोषी ठरवले होते. त्याला गुरुवारी मरेपर्यंत फाशीची कठोर शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी सुनावली. विवाहितेवर एक दोन नव्हे, तर तब्बल २८ आणि चिमुकल्या सहा वर्षीय मुलावर २४ वार करून शरीराची संपूर्णच चाळण करत निघृणपणे खून केल्याने आरोपी रामदास याने कु्ररतेची परिसीमा गाठली. विवाहिता महिलेच्या शरीराच्या संवेदनशील भागांनाही रामदासने जखमी के ले. त्यामुळे अशा आरोपीला समाजात जीवित राहण्याचा अधिकार नसून या दुर्मिळातील दुर्मिळ गुन्'ात फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी सरकारपक्षातर्फे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयाकडे केली. आरोपीच्या वकिलांनी रामदासच्या कुुटुंबाचा विचार क रून परिस्थितीजन्य पुराव्यांआधारे फाशीची शिक्षा न देता न्यायालयाकडे दयेची मागणी केली. न्यायमूर्तींनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत गुन्'ामधील आरोपीची क्रुरता व थंड डोक्याने रचलेला हत्येचा कट आणि न्यायालयापुढे सिद्ध करण्यात आलेले परिस्थितीजन्य पुरावे व तांत्रिक पुराव्यांच्या अधारे रामदासला दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. न्यायालयाने यावेळी रामदासला त्याची बाजू मांडण्याचीही संधी दिली. त्याने दयेची मागणी न्यायाधीशांकडे केली; मात्र शिक्षा सुनावल्यानंतर त्याच्या चेहºयावर कु ठल्याही पश्चातापाचे भाव नव्हते त्याचा चेहरा निर्विकार होता.
सातपूर भागातील कार्बननाका परिसरात रंगनाथ शिंदे यांच्या घरात भाडेतत्त्वावर कचरू विठ्ठल संसारे हे आपल्या पत्नी, तीन मुली व मुलासह राहत होते. १७ एप्रिल २०१६ रोजी संसारे यांच्या तीनही मुली सुटीनिमित्त बाहेरगावी गेलेल्या होत्या व ते रात्रपाळीवर कंपनीत गेले असता घरात त्यांची पत्नी पल्लवी संसारे (३०), विशाल संसारे (६) हे दोघे झोपलेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास रंगनाथ शिंदे यांचा मुलगा रामदास शिंदे याने विवाहितेसोबत अनैतिक संबंध व गैरकृत्याच्या उद्देशाने घरात प्रवेश के ला. दरम्यान, विवाहितेने त्यास प्रतिकार केला असता रामदास याने धारदार चाकूने विवाहितेच्या शरीरावर एकापेक्षा अधिक वार करून ठार मारले. त्याच्याविरुद्ध सबळ पुरावा मिळाल्याने पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हा खटला अत्यंत संवेदनशील असल्याने न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या न्यायालयात खटल्याच्या चौकशीचे कामकाज चालले. सरकारपक्षातर्फे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी एकूण २२ साक्षीदार तपासले. खटल्यात प्रत्यक्षदर्शी पुरावा नसल्यामुळे हा खटला संपूर्णत: परिस्थितीजन्य पुराव्यांवर अवलंबून होता. सरकार पक्षाच्या वतीने गुन्हा सिद्धतेसाठी सर्व पुरावे व घटनेच्या कड्या जोडण्यात आल्या. आरोपीच्या वतीने अॅड. असलम देशमुख यांनी बाजू मांडली. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या काही निवाड्यांचा आधार घेत परिस्थितीजन्य पुराव्यांआधारे फाशी देऊ नये, असा युक्तिवाद केला.
थंड डोक्याने चिमुकल्याला संपविले
विशाल झोपेतून जागा झाल्याने खुनाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार जिवंत राहू नये म्हणून रामदास याने अत्यंत थंड डोक्याने कट रचत त्याच चाकूने त्याच्यावरही हल्ला चढवून खून केला. खुनाच्या घटनेनंतर आरोपीने रक्ताने माखलेले कपडे बदलून मृतदेह असलेल्या खोलीला कुलूप लावून घटनास्थळावरून पलायन केले होते. तत्कालीन सहायक उपनिरीक्षक जगन्नाथ गायकवाड यांनी या दुहेरी खुनाचे तपासचक्रे वेगाने फिरवून सीबीएसवरून त्यास ताब्यात घेतले होते.
ई-पुरावे, मोबाइल संवाद ठरला महत्त्वपूर्ण
दुहेरी खूनप्रकरणी प्रत्यक्षदर्शी पुरावे उपलब्ध नव्हते. त्यामुळे हा खटला परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारलेला होता. आरोपी रामदास याने साक्षीदार व त्याचा मित्र सुभाष राजपूतकडे दिलेली ‘अतिरिक्त न्यायिक कबुली’वर हा खटला अवलंबून होता. यामुळे खटल्याच्या निकालाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. रामदास याने दुहेरी खुनानंतर मध्यरात्री ३.३० वाजेच्या सुमारास राजपूतशी संवाद साधून खून झाल्याचे सांगितले होते. त्याचा हा संवाद स्मार्ट मोबाइलमध्ये सुरक्षित सेव्ह झाला. या संवादाची ध्वनिफित न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्या. रामदासचा मूळ आवाज आणि संवादामधील आवाज, स्ट्रोक, फ्रिक्वेन्सी, संवादाचा ºिहदम अशा सर्वच बाबींमध्ये साम्य आढळले. वैज्ञानिक प्रयोग शाळेचा अहवाल (स्पेक्टोग्राफी रिपोर्ट) प्रत्यक्ष प्रात्यक्षिक न्यायालयात सुनावणीदरम्यान दाखविण्यात आले. न्यायालयाने रामदासचा अतिरिक्त न्यायिक कबुली जबाब ग्रा' धरला.
शिंदे फाशीचा सोळावा आरोपी
नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने गत १८ वर्षांत पाच गुन्ह्यातील सोळा आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे.
या वर्षाच्या प्रारंभी १८ जानेवारी रोजी न्यायालयाने सोनई हत्याकांड खटल्याचा निकाल देताना सहा आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. तसेच सोयगाव येथील पाटील पिता-पुत्राला, नाशिकरोड येथील सातोटे हत्याकांडातील सहा आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. आॅनरकिलिंग प्रकरणात १९ जून २०१७ रोजी विवाहितेच्या पित्याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यापाठोपाठ दुहेरी हत्याकांडातील रामदास शिंदे यास मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आल्याने जिल्हा न्यायालयातील फाशीच्या शिक्षेचा आकडा सोळा झाला आहे.
साक्षीदाराची फितुरी; गुन्हा दाखल
दुहेरी खून खटल्यातील रामदास याचा मित्र सुभाष राजपूत हा सरकारी पक्षाचा महत्त्वाचा साक्षीदार होता. मॅजिस्ट्रेटसमोर
जबाबात त्याने फोनवरील संवादाची कबुली दिली होती. रामदास याने गुन्हा केल्यानंतर त्याच्याशी मध्यरात्री सीबीएस ठक्कर बाजार येथून संवाद साधल्याचे त्याने म्हटले होते; मात्र न्यायालयापुढे त्याने आपली साक्ष फिरविली. रामदासने फोन केला नाही, अशी खोटी साक्ष दिली; मात्र न्यायालयापुढे १६४च्या जबाबानुसार मॅजिस्ट्रेट यांनी त्यांची पूर्वीची साक्ष सिद्ध केली. भादंवि कलम १९३ अन्वये खोटी साक्ष देत फितुरी केल्यामुळे त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात त्याला सात वर्षांचा कारावास कायद्याच्या तरतुदीनुसार होऊ शकतो.