सोग्रसच्या महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 12:38 AM2018-10-14T00:38:46+5:302018-10-14T00:39:52+5:30
चांदवड तालुक्यातील एका महिलेचा स्वाइन फ्लूने येथील एका खासगी रुग्णालयामध्ये मृत्यू झाला आहे.
Next
नाशिक : चांदवड तालुक्यातील एका महिलेचा स्वाइन फ्लूने येथील एका खासगी रुग्णालयामध्ये मृत्यू झाला आहे. सोग्रस येथील सुनीता चिंधू गांगुर्डे (३३) यांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना ५ आॅक्टोबरपासून येथील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. मात्र शनिवारी उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. चांदवड तालुक्यातील स्वाइन फ्लूचा हा पाचवा बळी आहे.