कडवा कालव्यात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 11:09 PM2018-08-02T23:09:23+5:302018-08-03T00:00:57+5:30
सिन्नर : तालुक्यातील विंचूरदळवी येथे शाळा सुटल्यानंतर घरी जावून पोहण्यासाठी गेलेले दोन विद्यार्थी कडवा कालव्यात बुडाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. त्यातील एका विद्यार्थ्यास वाचविण्यात यश आले; मात्र १३ वर्षीय सहावी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला.

तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील विंचूरदळवी येथे पहिली ते सातवीपर्यंत प्राथमिक शाळा आहे. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर साईराज मनोहर तांबे (१३) व ओमकार राजू पांडे (१०) हे घरी गेले. दप्तर ठेवल्यानंतर दोघे जामगाव रस्त्याजवळ वाहणाºया कडवा कालव्याकडे सायकल घेऊन गेले. दोघेही पोहण्यासाठी कालव्यात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात बुडू लागले. रस्त्याने दुचाकीहून जाणाºया संपत डांगे यांच्या सदर प्रकार लक्षात आला.
याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी, विनोद टिळे करीत आहेत. डांगे यांनी आरडाओरड करीत नागरिकांना मदतीसाठी बोलावले. तोपर्यंत डांगे यांनी ओमकार पांडे यास बाहेर काढले. मात्र साईराज मनोहर तांबे (१३) याचा यात दुर्देैवी मृत्यू झाला. नागरिकांच्या मदतीने मृत साईराज याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. साईराज हा सहावी इयत्तेत होता. सिन्नर नगर परिषदेच्या रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.