वाहनाच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 01:14 AM2017-12-25T01:14:21+5:302017-12-25T01:16:44+5:30

नाशिक : रविवारी सुटीनिमित्त मित्रांसमवेत दुचाकीवर फिरण्यासाठी गेलेल्या दिंडोरी रोडवरील वाढणे कॉलनीतील बावीस वर्षीय युवकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि़२४) दुपारी ढकांबे शिवारात घडली़ शुभम कैलास शिंदे (२२, रा़ गजपंथ विहार, म्हसरूळ) असे अपघातात मृत झालेल्या युवकाचे नाव असून, तो मूळचा धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील रहिवासी आहे़

 Death of the student in the shock of the vehicle | वाहनाच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू

वाहनाच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू

Next
ठळक मुद्दे वाहनाच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यूढकांबे येथील घटना : वाघ महाविद्यालयाचा विद्यार्थी

नाशिक : रविवारी सुटीनिमित्त मित्रांसमवेत दुचाकीवर फिरण्यासाठी गेलेल्या दिंडोरी रोडवरील वाढणे कॉलनीतील बावीस वर्षीय युवकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि़२४) दुपारी ढकांबे शिवारात घडली़ शुभम कैलास शिंदे (२२, रा़ गजपंथ विहार, म्हसरूळ) असे अपघातात मृत झालेल्या युवकाचे नाव असून, तो मूळचा धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील रहिवासी आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूळचा साक्री तालुक्यातील राजभाई शेवाळी येथील रहिवासी असलेला शुभम शिंदे हा आडगाव शिवारातील क़ का़ वाघ महाविद्यालयात एमसीएसचे शिक्षण घेत होता़ मावशीकडे शिकण्यासाठी आलेला शुभम रविवारी आपल्या पाच मित्रांसमवेत तीन दुचाकींवर फिरण्यासाठी गेला होता़ शुभमसोबतचे चार मित्र हे दोन दुचाकींवर तर शुभम हा एका दुचाकीने दुपारी म्हसरूळला घरी येत होते़ दिंडोरी रोडवरील ढकांबे शिवारात दुपारी चार वाजेच्या सुमारास समोरून आलेल्या भरधाव वाहनाने शुभमच्या दुचाकीस धडक दिली़
या अपघातात शुभमच्या डोक्यास जबर मार लागल्याने त्याच्या दोन्ही कानातून व नाकातून रक्त वाहू लागले़ त्याच्या मित्रांनी तत्काळ १०८ अ‍ॅम्ब्युलन्सने फोन करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ़ ठाकूर यांनी तपासून मयत घोषित केले़ एकुलता एक मुलगाअपघातात मृत्युमुखी पडलेला शुभम शिंदे हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता़ त्याने संगणक शाखेचे शिक्षण घेण्यासाठी वाघ महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. तो मावशीकडे राहात होता़ रविवारी सुटी असल्याने तो मित्रांसमवेत फिरण्यासाठी गेला होता़

Web Title:  Death of the student in the shock of the vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.