स्वाइन फ्लू संशयित महिलेचा मृत्यू

By admin | Published: December 2, 2015 10:58 PM2015-12-02T22:58:35+5:302015-12-02T22:59:02+5:30

स्वाइन फ्लू संशयित महिलेचा मृत्यू

Death of a suspected swine flu woman | स्वाइन फ्लू संशयित महिलेचा मृत्यू

स्वाइन फ्लू संशयित महिलेचा मृत्यू

Next

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात उपचार सुरू असलेल्या गर्भवती महिलेचा मंगळवारी (दि़ २) पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला़ मयत महिलेचे नाव माया सुनील सोनवणे (२५) असे असून ती येवला तालुक्यातील खामगाव येथील रहिवासी आहे़
स्वाइन फ्लूच्या लक्षणांमुळे सोनवणे यांना उपचारासाठी मंगळवारी (दि़ १) जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ दरम्यान, त्यांचा स्वॅब तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आला असून वैद्यकीय अहवाल प्राप्त झालेला नाही़ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कोने येथील राजाराम बाळू खरवडे (३५) या व्यक्तीचाही स्वाइन फ्लू संशयित आजाराने मृत्यू झाल्याची घटना २२ नोव्हेंबरला घडली आहे़ आतापर्यंत जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात उपचार घेत असलेल्या २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Death of a suspected swine flu woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.