जि.प सदस्याच्या मुलाच्या गाडीच्या धडकेने शिक्षकाचा जागीच मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2017 03:33 PM2017-11-12T15:33:04+5:302017-11-12T15:34:13+5:30

चौंधाणे - जोरण रस्त्यावर भरधाव वेगाने येणा-या चारचाकीने दुचाकी स्वारास उडवल्याने झालेल्या अपघातात दुचाकी स्वार मृत झाला आहे.

Death of teacher on the spot of ZP member's son's vehicle | जि.प सदस्याच्या मुलाच्या गाडीच्या धडकेने शिक्षकाचा जागीच मृत्यू 

जि.प सदस्याच्या मुलाच्या गाडीच्या धडकेने शिक्षकाचा जागीच मृत्यू 

googlenewsNext

सटाणा (नाशिक) : चौंधाणे - जोरण रस्त्यावर भरधाव वेगाने येणा-या चारचाकीने दुचाकी स्वारास उडवल्याने झालेल्या अपघातात दुचाकी स्वार मृत झाला आहे. दरम्यान चारचाकी चालक गणेश हा बागलाण तालुक्यातील पठावे दिगर गटाचे जिल्हापरिषद सदस्य व माजी आमदार लहानू अहिरे यांचा मुलगा असून मृत समाधान वाघ हे शिक्षक होते. 

ही दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास चौंधाणे-जोरण रस्त्यावर घडली. दरम्यान अहिरे मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी त्यांच्या अटकेची मागणी केली.त्यानंतर सटाणा पोलिसांनी अहिरे यांना अटक करून गुन्हा दाखल केला. या बाबत अधिक माहिती अशी कि, जिल्हापरिषद सदस्य गणेश अहिरे शनिवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास स्वतःच्या चारचाकीने (क्रमांक एमएच 12 एनपी 6450) पठावेकडून जोरणमार्गे सटाण्याकडे येत होते. भरधाव वेगाने मोटारकार जात असतांना चौंधाणे-जोरण रस्त्यावरील चिंचपाटी नजीक शिक्षक समाधान वसंत वाघ (27)  हे आपल्या शेतातून जोरण रस्त्याकडे येत होते. दरम्यान अहिरे यांच्या मोटारकारने त्यांना जोरदार धडक दिली व ते यात गंभीर जखमी झाले. यावेळी वाघ यांना जखमी अवस्थेत उचलून अहिरे यांनी स्वतः उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात भरती केले. मात्र, अतिरक्तस्रावमुळे उपचारादरम्यान वाघ यांचा मृत्यू झाला. 

वाघ यांच्या अपघाती निधनाची वार्ता पसरताच निकवेल येथील ग्रामस्थांची येथील ग्रामीण रुग्णालय आवारात गर्दी केली. यावेळी संतप्त नातेवाईकांनी वाघ यांच्या मृत्यूला जिल्हापरिषद सदस्य अहिरे यांना जबाबदार धरले. अहिरे मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्यामुळेच ही दुर्घटना घडली असून त्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी केली. यामुळे तणाव निर्माण झाला होता.पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांनी तत्काळ ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन नातेवाईकांना शांततेचे आवाहन केले.त्यानंतर जिल्हापरिषद सदस्य अहिरे यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी रात्री उशिरा अहिरे यांची वैद्यकीय तपासणी करून रक्ताचे नमुने घेतले असून ते नाशिक येथील प्रयोगशाळेत तापसणीसाठी पाठविण्यात आले असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

Web Title: Death of teacher on the spot of ZP member's son's vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.