अपघातातील जखमी किशोरचाही मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 12:26 AM2018-10-01T00:26:28+5:302018-10-01T00:26:43+5:30
हिंगोली येथून गणपती विसर्जन करून भर येथील राजमद्रा बँड पथक हे गणपती विसर्जनासाठी सिंदखेड राजा येथे निघाले होते. पण २३ तारखेला मध्यरात्री बॅन्डपथकाच्या महिंद्रा जीप लक्झरीचा भिषण अपघात झाला. या अपघात एवढा भीषण होता की त्यातील पाच जण जागीच ठार झाले तर बाकीचे ९ गंभीर जखमी झाले होते. त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथे पाठवले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
कापडसिंगी : हिंगोली येथून गणपती विसर्जन करून भर येथील राजमद्रा बँड पथक हे गणपती विसर्जनासाठी सिंदखेड राजा येथे निघाले होते. पण २३ तारखेला मध्यरात्री बॅन्डपथकाच्या महिंद्रा जीप लक्झरीचा भिषण अपघात झाला. या अपघात एवढा भीषण होता की त्यातील पाच जण जागीच ठार झाले तर बाकीचे ९ गंभीर जखमी झाले होते. त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथे पाठवले होते.
हा अपघात बुलढाणा जिल्ह्यातील ब्राह्मण चिकणा गावाजवळ घडला. यातील कापडसिंगी येथील किशोर जोगदंड हा गंभीर जखमी झाला होता. तर त्याला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटीत पाठवले होते. परंतु किशोरची परिस्थिती चिंताजनक असल्याने त्याला उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले. प्रकृतित सुधारणा न झाल्याने अखेर किशोर जोगदंड यांचा मुंबई येथे २९ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली. किशोर हा अत्यंत गरीब कुटूंबातील मनमिळावू स्वभावाचा होता. तो भर जहॉगीर येथील बॅन्डपथकात काम करत असे. घरची परिस्थिती हलाखीची अन त्यात आता घरातील कर्ता पुरूष गेल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मयत किशोर जोगदंड यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे.
अपघातात वाशिम जिल्ह्यातील शिरपूर येथील दोन युवक तर भर जहॉगीर येथील ३ युवक ठार झाले, तर हिंगोली जिल्ह्यातील कापडसिंगी येथील किशोर जोगदंड (३२) यांचा मुंबई येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. किशोर जोगदंड यांच्यावर कापडसिंगी येथे रविवारी दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.