ओझे येथील कादवा नदीत बुडुन तिघांचा मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 07:27 PM2019-06-09T19:27:02+5:302019-06-09T19:27:45+5:30

दिंडोरी : तालुक्यातील ओझे कादवा नदीवर सकाळी ११ वाजे दरम्यान कपडे धुण्यासाठी व ओझे येथे पाहुणे आलेली अनिता वाघमारे तसेच मुलगा ओंकार वाघमारे तसेच प्राजक्ता बाळू गांगोडे हे कादवा नदीत बुडाले असून अनिता यादव वाघमारे (२९) व प्राजक्ता गांगोडे ह्या दोघीना ओझे येथील ग्रामस्थांनी पाण्यातुन शोधून बाहेर काढले असून अनिता वाघमारे व प्राजक्ता गांगोडे (१५) मृत पावल्या आहेत. तसेच ओंकार वाघमारे (१४) याचा उशिरा मृतदेह हाती लागला.

The death of three people drowned in Kadawa river at Oz | ओझे येथील कादवा नदीत बुडुन तिघांचा मृत्यु

ओझे येथील कादवा नदीत बुडुन तिघांचा मृत्यु

googlenewsNext
ठळक मुद्दे ओंकार वाघमारे याचा उशिरा मृतदेह हाती लागला.

दिंडोरी : तालुक्यातील ओझे कादवा नदीवर सकाळी ११ वाजे दरम्यान कपडे धुण्यासाठी व ओझे येथे पाहुणे आलेली अनिता वाघमारे तसेच मुलगा ओंकार वाघमारे तसेच प्राजक्ता बाळू गांगोडे हे कादवा नदीत बुडाले असून अनिता यादव वाघमारे (२९) व प्राजक्ता गांगोडे ह्या दोघीना ओझे येथील ग्रामस्थांनी पाण्यातुन शोधून बाहेर काढले असून अनिता वाघमारे व प्राजक्ता गांगोडे (१५) मृत पावल्या आहेत. तसेच ओंकार वाघमारे (१४) याचा उशिरा मृतदेह हाती लागला.
घटनास्थळी प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर ग्रामस्थांच्या वतीने पोलीस पाटील भाऊसाहेब ढाकणे, उपसरपंच अशोक पाटील, व ग्रामस्थ मदत करत आहेत. मयत अनिता वाघमारे ही उमराळे खुर्द अंगणवाडी मदतणीस आहे. ही ओझे येथे पाहूणी म्हणून आली होती.
दिंडोरी तालुक्यातील ओझे येथे कादवा नदी पात्रात कादवा नदी पात्रात नुकतेच करंजवण धरणातून पाणी सोडल्यामुळे ओझे गावाजवळ पाण्याची पातळी जास्त होती. कपडे धूत असताना तोल जाऊन पडल्याने तिघेही कादवा नदी पात्रात बुडाले. घटनास्थळ निर्जन ठिकाणी असल्यामुळे ही बाब कोणाच्याही लवकर लक्षात आली नाही. परंतु नदीपात्राच्या जवळून जात असलेल्या एका भंगारवाल्याच्या लक्षात आल्याने त्याने ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली ग्रामस्थांनी घटनास्थळी जात कादवा नदी पात्रात शोध कार्य सुरू केला. प्रारंभी अनिता वाघमारे यांचा मृतदेह हाती लागला. त्यानंतर दुपारी प्राजक्ता गांगोडेचा मृतदेह सापडला. तर सायंकाळी ओंकार वाघमारे त्याचा मृतदेह हाती लागला. तिघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने पोलिस नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.
(फोटो ०९ कादवा १, ०९ अनिता वाघमारे)

Web Title: The death of three people drowned in Kadawa river at Oz

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात